काशिमीरा येथील जंगलास लागलेल्या आगी प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला 

भाईंदर दि . २५ ( वार्ताहर)  : काशिमीराच्या माशाचा पाडा लगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवारी लागलेल्या आगी प्रकरणी वन विभागाने अनोळखी लोकं विरोधात वन अधिनियमा नुसार गुन्हा दाखल केला आहे . तर सकाळ पासुन जंगल पेटले असताना आग विझवण्यासाठी घटनास्थळी न फिरकणाऱ्या वन विभागाच्या अधिकारी – कर्मचारी याना निलंबित करण्याची मागणी  केली जात आहे .
जंगलात आग भडकल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी सचीन जांभळे यांना मिळाल्या नंतर ते आपले सहकारी अमित दास, इरफान बिनदिनीफ  यांच्यासह जंगला कडे धाव घेतली. वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९०६ वर अनेक वेळा संपर्क केला . काही वन अधिकाऱ्यांशी संपर्काचा प्रयत्न केला . पण प्रतिसाद मिळाला नाही.
अग्निशमन दलास १०१ वर संपर्क केला असता जंगलातील आग विझवायला आमच्या कडे यंत्रणा नसल्याचे सांगत त्यांना मीरा भाईंदर महापालिकेच्या सिल्वर पार्क अग्निशमन केंद्राने देखील सुरवातीला हात झटकले .
जांभळे व सहकारयांनीच आग वाढु नये म्हणुन प्रयत्न सुद्धा केले . पण सुका पाला पाचोळा व वारया मुळे आग वेगाने पसरली होती. काशिगाव येथील वन विभागाच्या कार्यालयास चक्क टाळे लागले होते. सायंकाळ झाली तरी आग विझवण्यात आली नव्हती. आगी मुळे माकडं आदी वन्यजीव सैरावैरा पळत सुटल्याचे तसेच अनेक जीव आगीत भस्मसात झाल्याचे जांभळे यांनी सांगीतले.
सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्यांना जबाबदारी झटकत असल्या बद्दल विचारल्या नंतर जवानांनी घटनास्थळ गाठले . डोंगरावर पायी जात आग विझवण्याचा प्रयत्न केला.
गेल्या 4 -5 महिन्यां पासुन या परिसरातील जंगलास आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागात भुमाफियांनी जंगलात तसेच जंगला लगत मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा उभारल्या आहेत. त्यावर वन विभाग आणि महापालिका कारवाईच करत नाही. आणखी झोपडय़ा उभारण्यासाठी आगी लावुन जंगल नष्ट करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप जांभळे यांनी केला आहे.
या आधी देखील आगी लागण्या सह येथे चालणारे मद्यपान, अमलीपदार्थ व अन्य गैरप्रकारां बाबत १० ते १५ वेळा तक्रारी केल्या आहेत. ४ ते ५ वेळा आगी लागल्या आहेत. उद्यानाचे प्रमुख अधिकारी अहमद अनवर यांना भेटुन तक्रार केली होती. परंतु वन विभागासह महापालिके कडुन आगी लावण्याचे प्रकार रोखण्यासह बेकायदा झोपडय़ा , गैरप्रकारांवर कारवाई करण्या ऐवजी पाठीशी घातले जात असल्याचे ते म्हणाले. बेजबाबदार वन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली .
दरम्यान वन विभागाने मात्र सदर आग लावल्या प्रकरणात अनोळखी लोकां विरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगत तपास सुरु आहे असे सांगितले . सुमारे अडीज एकर मधील जंगलला आग लागल्याचे सांगण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!