“कोकण पर्व-कोकण सर्व’” २५० स्टॉल्सची बाजारपेठ उभारणी हे आव्हान

नालासोपारा :३० व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचा ‘मेगा ईव्हेंट’ म्हणून नालासोपाऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘“कोकण पर्व-कोकण सर्व” या महामहोत्सवाच्या तयारीला आता गती मिळाली आहे. याच संदर्भात आयोजन समितीची येथे एक बैठक झाली. पदाधिकारी हेमंत म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली.

२५० स्टॉल्स आणि भव्य बाजारपेठ उभारणी करण्याचे आव्हान स्विकारुन मैदानाची पाहणी व आखणी काम सुरू करण्यात आले आहे. पदाधिकारी प्रकाश वनमाळी यांनी उपस्थित नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या सूचना घेत त्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून त्यात नालासोपाऱ्यातील ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते-महिलांना स्थान देण्यात आले आहे. हेमंत म्हात्रे, रमाकांत वाघचौडे, नरेश जाधव, शांताराम वाळिंजकर, मकरंद सावे, वंदना वर्तक, अजय किणी, अमित वैद्य, रवी पिल्ले आणि सर्व प्रभाग समिती सभापती या समित्यांवर काम करणार आहेत.

या बैठकीत नालासोपारा शालेय कला क्रीडा महोत्सव जो आधी जाहीर करण्या आल्याप्रमाणे येत्या २४ नोव्हेंबर रोजी सुरू होणार होता. तो महोत्सव पुढे ढकलण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली.

कोकणातील लोककलांचा रोजच्या रोज आविष्कार

या महामहोत्सवात केवळ कोकणातील विविध लोककलांचे सादरीकरण होणार आहे. व्यावसायिक नाही परंतु व्यावसायिक दर्जाचे कार्यक्रम करणाऱ्या हौशी संस्था, कला मंडळं, कलावंतांना संधी प्राधान्याने देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी, कोळी, वाडवळी, कुपारी, कोकणी कलाकार व कला मंडळांनी या संदर्भात त्वरित संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. त्यासाठी पुढील मोबाईल क्रमांक आहेत. 9822263177, 9323515670, 9850674027, 9923582739.

या बैठकीत प्रभाग सभापती भरत मकवाना, निलेश देशमुख, प्रशिक्षण विभाग प्रमुख वंदना वर्तक, नगरसेवक मार्शल लोपीस यांनीही आपले विचार मांडले. देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त स्व.टी.एन.शेषन यांच्या निधना निमित्ताने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. देशाचे ज्येष्ठ नेते स्व.मधू दंडवते, डॉ. सलीम अली खान, बनारस हिंदू विश्व विद्यापीठाचे संस्थापक पं.मदन मोहन मालवीय यांच्या स्मृतीस जयंती व पुण्यतिथी म्हणून आदरांजली वाहण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!