कोमसापला नालासोपारा पदाधिकाऱ्यांनी दिली सोडचिठ्ठी

वसई (वार्ताहर) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नालासोपारा शाखेतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देवून नवीन साहित्य परिषद स्थापन करण्याची घोषणा केल्यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मोरेगावांतील शिवमंदिरात झालेल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला ही घोषणा करून नालासोपारा शाकेचे अध्यक्ष ऍड.रमाकांत वाघचौडे यांनी खळबळ उडवून दिली.त्यांच्या या मतांशी सहमती दर्शवून डॉ.धनावडे आणि सीमा पाटील यांनी त्यांना पाठींबा दिला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलनाचीही घोषणा यावेळी करण्यात आली.येत्या महात्मा फले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या संमेलनाच्या माध्यमातून पहिला कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

कोमसापचे नरेश जाधव,रमाकांत पाटील,रविंद्र माने,डॉ.आशा मुंढे,पंकज देशमुख असे कार्यकारिणी सदस्य यावेळी उपस्थित होते.कोमसापच्या माध्यमातून काम करीत असताना विचारांचे,कृतीचे स्वातंत्र्य नसेल तर राजीनामा देणे योग्यच असल्याचे वाघचौडे यांनी स्पष्ट केले. 24 मार्च 1991 हा कोकण मराठी साहित्य संमेलनाचा वर्धापनदिन,याचदिवशी नालासोपारा शाखेची तीन वर्षांपुर्वी स्थापना झाली होती.गेली तीन वर्षे या शाखेने विविध कार्यक्रम घेवून साहित्य रसिकांना चांगली मेजवानी दिली होती. या शाखेचे रमाकांत वाघचौडे,कार्याध्यक्षा डॉ.सुरेखा धनावडे,कोषाध्यक्षा सीमा पाटील,नरेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सातत्याने कोमसापची ज्योत तेवत ठेवली होती.मात्र,आज अचानक ही शाखा अध्यक्ष रमाकांत वाघचौडे यांनी राजीनामा देवून बरखास्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!