कोरोना कोवीड-२०१९ व्हायरसच्या प्रतिबंधासाठी गोल्डन पार्क रुग्णालय सज्ज आहे !

तर…. केंद्र, राज्य शासन तथा महापालिकेने खाजगी हॉस्पिटलचे सर्वेक्षण करावे – माल्कम पेस्तनजी यांचे भावनिक प्रतिपादन

वसई : कोरोना या जीवघेण्या विषाणूने जगभरात थैमान घातले असल्याने भारतात हि या जीवघेण्या विषाणूची देशभर लागण झाल्याचे चित्र उघड होत असताना सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.  त्यातच कोवीड-२०१९ या जीवघेण्या व्हायरसच्या प्रतिबंधासाठी जगभर कुठलेही औषध नसल्याने या विषाणू पासून वाचण्याकरिता बचावाच्या उपाययोजना युध्दपातळीवर सुरु आहेत. तसेच मुंबई नजीकच्या पालघर जिल्ह्यातील प्रसिध्द वसईतील गोल्डन पार्क या सर्व सोयी-सुविधायुक्त हॉस्पिटल या गंभीर समस्येसाठी सज्ज असल्याचे सांगत केंद्र, राज्य शासना व्यतिरिक्त वसई-विरार महापालिका प्रशासनाने देखील येथील खाजगी हॉस्पिटलचे तात्काळ सर्वेक्षण करावे,असे भावनिक आवाहन राज्य सरकारला वसईतील गोल्डन पार्क या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.माल्कम पेस्तनजी यांनी करून एक प्रकारे निवेदन हि केले आहे.

दरम्यान कोरोना व्हायरस २०१९ नेमकं काय आहे, आणि त्याची कशा प्रकारे रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने  कर्मचारी व नागरिकांनी काळजी घ्यावी या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी गोल्डन पार्क रुग्णालया तर्फे शनिवारी दुपारी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कॉवीड -२०१९ या माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात रुग्णलयाचे डॉक्टर माल्कम यांनी या व्हायरस विषयी लागणारे मेडिकल किट व मास याविषयी वैद्यकीय दृष्टया सविस्तर माहिती विशद केली. सोबत हॉस्पिटलच्या प्रशासक ऋतुजा बकरे यांनी या व्हायरस विषयी प्रोजेक्टर मार्फत सविस्तर माहिती व उपाययोजना विशद केल्या.

या रुणलायचे सर्वेसर्वा डॉ.माल्कम यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कामकाजाचा कोरोना बचाव विषयीचा आढावा खास करून विशद केला.अधिक माहिती देतांना डॉ.पेस्तनजी म्हणाले कि.जग आणि इतर देश या कोरोना व्हायरस व त्याच्या फैलावा विषयी जितके संवेदनशील आणि जागरूक आहेत त्याच्या तुलनेने आपला देश, राज्ये, जिल्हे आणि तालुके तितकेसे जागरूक नाहीत, हि खंत आहे. राज्य सरकाने राज्यातील सर्वच खाजगी हॉस्पिटल व स्थानिक पातळीवर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंदाचे सर्वेक्षण करावे आणि त्यातून वसई तालुक्यातील सुध्दा सरकारी व खाजगी रुग्णालये व केंद्र यांचा सविस्तर आढावा घेऊन आपण खरोखर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपणास त्यास प्रतिबंध करता येईल का यासाठी या संपूर्ण आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्था व त्याच्या परिस्थितीचे सर्वेक्षण करावे असे हि निवेदन राज्यसरकारला या माध्यमातून केले आहे.

एकूणच या प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमानंतर डॉ.माल्कम यांनी पत्रकार परिषदेस सामोरं जाताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली, यावेळी त्यांना आपल्याला केंद्र ,राज्य अथवा जिल्हा आरोग्य विभागाकडून या कोरोना व्हायरस व त्यांचा बचाव कसा करावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेची काही पत्रव्यवहार आला आहे का तर डॉ.माल्कम यांनी जागतिक आरोग्य संघटना यांच्या व्यतिरिक्त काहीही सूचना व राज्य सरकार अथवा स्थानिक महापालिकेकडून आलेल्या नाहीत.

तर वसई विरार महापालिकेकडून आपणास काय अपेक्षा आहेत याविषयी बोलतांना डॉ.माल्कम म्हणाले कि, ”प्रथम महापालिकेने वसईतील स्वत:च्या हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र व आमच्या खाजगी हॉस्पिटलचे सर्वेक्षण करावे आणि मगच आपण या कोरोना ला खऱ्याअर्थी लढत देऊ शकतो का याचे आत्मचिंतन करावे,आम्ही कटिबध्द व तयार आहोत फक्त सरकार व स्थानिक महापालिकेने आम्हाला मदतीचा हात द्यायला हवा. माझी रुग्णालय टीम कोरोना व्हायरस च्या लढयासाठी तयार आहोत केवळ माझ्या कर्मचारी व डॉक्टरांच्या जीवाची जबाबदारी कुणाची, मी त्यांना स्पष्ट केले आहे कि आपण या मिशन मध्ये सहभागी होणार असतील तर तसे रूग्णलयाला लेखी द्यवा अन्यथा मी तुमचा जीव धोक्यात घालणार नाही, अखेर माझी टीम माझ्यासोबत नसेल तर मी कोरोना विरुध्द लढू शकत नाही.”असे हि ते म्हणाले.

जभगर आज कोरोनाची दहशत माजली असताना आपलं देश व राज्य या सम्यसेबाबत किती संवेदनशील आहे हे बघण्याची वेळ आता आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!