खासदार गावितांकडून ६९ गावाच्या पाणी योजनतेतील जलकुंभ व वाहिन्यांची पाहणी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेचे अधिकारी यांना योजनेच्या जलद कार्यवाहीसाठी सूचना

वसई : ६९ गावाच्या पाणी योजनेतील जलकुंभ तसेच वितरण व्यवस्था याची पाहणी करण्यासाठी खासदार श्री. राजेंद्र गावित यांनी शुक्रवार दिनांक ०७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष दौरा केला, प्रातिनिधिक स्वरूपात वसई पूर्व येथील कामण,देवदळ, चिंचोटी , चंद्रपाडा, राजिवली, गोखिवरे, वसई पश्चिमेकडील उमेळे, नायगाव, खोचिवडे, वासळई तरखड, वाघोली, नाळे इ. गावामध्ये भेटी देऊन जलकुंभ तसेच वितरण वाहिन्या यांची स्थिती व योजना जलदगतीने कार्यन्वित करण्यासाठी करावी लागणारी उपाययोजना याची माहिती घेतली. तसेच अधिकारी व योजेतील ठेकेदार यांना सूचना देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

नादुरुस्त जलकुंभ, तुटलेल्या जलवाहिन्या यांची दुरुस्ती

गेली ५ वर्ष वापराविना पडून असलेल्या टाक्यमध्ये गळती तसेच अनके ठिकाणी मुख्य व अंतर्गत जल वाहिन्यांची काही प्रमाणात नासधूस झाल्याची तक्रार ग्रामस्थ तसेच पदाधिकारी यांनी केली असता, पाणी भरताना जलकुंभामधून गळती असल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे तसेच मुख्य जलवाहिन्यांची दुरुस्ती करणार असल्याचे अधिकारी व ठेकेदार याच्या वतीने सांगण्यात आले.

प्लास्टिक ( PVC )  पाईप  बदलण्याची तयारी

९ गावाची योजनेला मंजुरी मिळताना तसेच काम सुरु होताना ती प्रामुख्याने ग्रामीण योजना म्हणून सुरुवात झाली, त्यामुळे ग्रामीण योजनेच्या निकषाप्रमाणे अंतर्गत जलवाहिन्या या प्लास्टिक ( PVC ) पाईप च्या टाकण्यात आल्या असून अनेक ठिकाणी महापालिका तसेच बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या कामांमुळे त्या तुटलेल्या आहेत, आता या वाहिन्या दुरुस्त करताना त्या शहरी निकषाप्रमाणे धातूचे पाईप टाकण्याची गरज असल्याची माहिती अधिकारी वर्गाकडून देण्यात आली तसेच त्यासंबंधीची कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

महामार्ग प्राधिकरण व MMRDA अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक

वसई पूर्व भागातून बाफाने येथे जलवाहिनी महामार्ग पार करून पलीकडे नेण्यासाठी महामार्ग प्राधिकरण तसेच काही भागामध्ये MMRAD ची परवानगी आवश्यक असल्यामुळे त्यासंबधी सोमवार १० डिसेंबर रोजी खासदार राजेंद्र गावित यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्याची बैठक सकाळी ११ बाफाने येथे आयोजित पार पडली, या बैठकीला MMRA महामार्ग प्राधिकरण व जिवन प्राधिकरण चे अधिकारी, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. दुधवाड , श्री काकडे , महापालिकेचे मुख्य अभियंता श्री. माधव जवादे, अभियंता आर. के . पाटील, ठेकेदार प्रतिनिधी, तसेच भाजपचे श्री. श्याम पाटकर, मनोज पाटील, राजू म्हात्रे, प्रवीण गावडे, केदारनाथ म्हात्रे, महिंद्रा पाटील, सुनील किणी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!