“गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण यांना प्रदान होणार

मुंबई दि.२६ :  राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात सन्मानाचा दिला जाणारा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण यांना घोषित झाला असून येत्या २९ ऑक्टोबर रोजीरवींद्र नाटय मंदिर येथे होणाऱ्या समारंभात रामलक्ष्मण यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
राज्यशासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास“गानसम्राज्ञी लता मंगेशकर” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु.५.०० लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण यांची निवड केली आहे. यापूर्वी हे पुरस्कार श्रीमती माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं.जितेंद्र अभिषेकी, पं.हदयनाथ मंगेशकर, ज्योत्सना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा,रवींद्र जैन,स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की,कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग, श्रीमती पुष्पा पागधरे यांना प्रदान करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्रीसुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर विश्वनाथ महाडेश्वर,खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गतवर्षीच्या पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा पागधरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होणार आहे.
 या पुरस्काराबरोबर ‘हमसे बढकर कौन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना कमलेश भडकमकर यांचीअसून विश्वजीत बोरवणकर, ऋषीकेश कामरेकर, मयुर सुकाळे, अमृता नातू,ज्ञानेश्वरी देशपांडे, मुग्धा कराडे आणि इतर सहकलाकार हे गायक असून आर्चिस लेले, कृष्णा मुसळे, भीसाजी तावडे, विजय जाधव, सागर साठे,अश्वीन रोकडे, वरद कठापूरकर, मनीष कुलकर्णी, नागेश कोळी, राहूल देव हे वादक कलाकार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन समीरा गुजर करणार असून चेतन महाजन हे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत. पुरस्कारार्थीचा सन्मानार्थ रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचा‍लिका, श्रीमती स्वाती काळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!