गुजरातपर्यंत पसरले पालघरमधील भुकंपाचे लोण

वसई (वार्ताहर) : पालघरमध्ये आज सकाळी भुकंपाने दिलेले धक्के गुजरातच्या सिमेपर्यंत पोहोचले असून,भुकंपाच्या या विस्तारामुळे पालघरवासीय भयभित झाले आहेत.

नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या पालघर जिल्ह्याच्यातील भुकंपाने गुजरातच्या सिमेवर काल सकाळी धडक दिली. सकाळी ११ वाजून १४ मिनीटाला ४.३ रिश्टर स्केल इत्या तीव्रतेचा भुकांपाचा झटका पालघरमध्ये बसला. तलासरी, डहाणू आणि बोईसर परिसरात बसलेल्या या ध््याची तीव्रता  गुजरातच्या सिमेवरील उमरगांवपर्यंत जाणवली.भुकंपाची सवय झाल्यामुळे आणि संरक्षणाच प्राथमिक धडे येथील नागरिकांना देण्यात आल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.

सुरवातीच्या ध््यामुळे घराच्या भिंतींना तडे गेले आणि भांडी पडल्यामुळे ग्रामस्थ भयभित झाले होते.त्यानंतर भुकंपाचे वारंवार धक्के बसु लागल्यामुळे येथील गावे हादरुन गेली. कुर्झे, दापचरी, धुंदलवाडी, वरखंडा, हळदपाडा, वडवली, अंबोली नांदगांव, तारापुर अणुशक्ती केंद्र ही गावे भुकंपाने केंद्रीत केली. त्यामुळे घाबरून ग्रामस्थ रात्री घराबाहेर अंगणात झोपत आहेत.११ नोव्हेंबरपासून सुरु झालेले धक्के तलासरी,डहाणू,बोर्डी असे सरकु लागले होते.त्यामुळे भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या तज्ञांचे एक पथक डिसेंबरपासून भुकंपाचे केंद्रबिंदु असलेल्या धुंदलवाडीत शोध घेत आहेत. मात्र, भुकंपाची कारणे सापडण्याऐवजी त्यांची संख्या आणि विस्तार वाढत चालला आहे.

नालासोपारातही ११:१६ वाजता या भुकंपाचा सौम्य झटका जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. जिल्ह्यातील वर्जेश्वरी, गणेशपुरी,अकलोली आणि सातीवली या परिसरात गरमपाण्याची कुंडे आहेत. जमीनीखालील लाव्हा रसामुळे या कुंडातील पाणी गरम रहात असून,याच कारणास्तव भुकंपाचे धक्के बसत असल्याचे बोलले जात आहे.तर वाढत्या नागरिकरणामुळे गौणखनीज संपत्ती मिळवण्यासाठी भुगर्भात उत्खनन केले जात असल्यामुळे समतोल बिघडून भुकंपाचे धक्के बसत असल्याचेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!