गोखविरे येथे होणारी वाहनांची कोंडी दूर होणार 

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील वसई अंबाडी रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ कडे जाताना गोखिवरे नका येथे रास्ता अरुंद असल्यामुळे नागरिकांना तसेच बाहेरून वसईत येणाऱ्या प्रवाशांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
गोखिवरे नाक्याच्या वसई ते हायवे अशा दोन्ही बाजूस रास्ता रुंदीकरण झालेले आहे. परंतु गोखिवरे नाक्यावर असलेल्या स्थनिकांच्या घरांमुळे व चाळींमुळे आजतागायत गोखिवरे नाक्याचे रास्ता रुंदीकरणाचे काम झालेले नव्हते. याचा प्रचंड त्रास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, रिक्षावाले, वाहनचालक यांना होत असे. कधीतरी १ ते २ किलोमीटर र्पर्यंत वाहनांची रांग लागत असे. गोखिवरे नाक्यावरील वाहतूक कोंडी समस्येवर तेथील रास्ता रुंदीकरण हा एकमेव उपाय होता. यासाठी सदर ठिकाणी धारकर यांचे घर ते गोखिवरे विभागीय कार्यालयापर्यंत रास्ता रुंदीकरण व दोन्ही बाजूस गटार बांधकाम करणेचे रु.१.८४ कोटी किमतींचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे.
रास्ता रुंदीकरणात येणारी घरे, इमारती, झाडे, विद्युत पोल हटविण्यासाठी व त्यावर उपयोजना करण्यासाठी नारायण मानकर, अजय खोखणी, अब्दुल पटेल, यांनी जागा मालकांची भेट घेऊन मार्ग काढण्यासाठी अनेक वेळा चर्चा करून विनवणी केली आहे. त्यावर लवकरच तोडगा निघणार आहे. सदर विकास कामाचे भूमीपूजन दि.०५/०३/२०१९ रोजी सायंकाळी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आले. सदर कामामुळे वाहतूक कोंडी दूर होवून चालकांचा वेळ व पैसा याचीही बचत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!