गोखिवरे नाक्यावर अवतरलेल्या गटर गंगेने रोगराईची भिती

वसई (वार्ताहर) : गोखिवरे गावच्या नाक्यावर असलेल्या काशिविश्वेश्वर मंदिरा समोर गेल्या काही महिन्यांपासून गटार गंगा अवतरली आहे .गेल्या आठवड्यात परतीचा पाऊस थांबला असलातरी गटार गंगा सुरुच असल्याने नाक्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना व गावात येणा-या पाहुण्याना या गटार गंगेत पायधुनी करुनच प्रवेश करावा लागत आहे. या गटार गंगेचा उगम विजय पराडाइजच्या चेंबर मधून झाला आहे.वसई विरार महापालिका कर्मचाऱयांनी दोन वेळा प्रयत्न करुनही ही गटार गंगा अन्य मार्गाने वळवीन्यात यश आले नाही. उलट पालिका  कर्मचाऱयांनी गटार गंगेच्या मर्मावर पहारिचे घाव घातल्याने ती आता शीव मंदिरा समोर रस्त्याच्या मधोमध उगम पावून व्याकुळ्तेने वाहत आहे. विशेष म्हणजे गंगेचे नाव धारण करना-या तडफड्दार समजल्या जाना-या ग्रेट पालिका आयुक्त गंगाधरन यांच्या कडे या गटार गंगेला शान्त करण्यासाठी तद्न्य इंजीनियर नसावा याचेच सर्वाना आचर्य वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!