गोरेगाव मोतीलाल नगरमध्ये मायक्रो सिटी ऑक्टोबरमध्ये गृहप्रकल्पाची पायाभरणी – मधु चव्हाण

मुंबई (जयंत करंजवकर) :  गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर येथे म्हाडातर्फे ३० हजार कोटींचा गृहप्रकल्प उभारण्यात येणार असून त्याचा पायाभरणीचा कार्यक्रम येत्या ऑक्टोबर महिन्यात होईल. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे माझे स्वप्न असून ते प्रत्यक्षात आणण्यास वचनबद्ध आहे, अशी घोषणा म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.  हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुमारे      ३० हजार कोटींचा असून  त्यात मायक्रो सिटी वसविण्यात येणार आहे. निवासी वसाहतीबरोबर तेथे वृद्धाश्रम, महिलांसाठी हॉस्टेल, हॉस्पिटल आदी सुविधांचा या मायक्रो शहरात समावेश होणार आहे, अशी माहिती देतांना मधु चव्हाण यांनी मोतीलाल नगरमध्ये राहणा-या रहिवाशांना संक्रमण शिबिरात जाण्याची गरज नाही. जागा उपलब्ध असल्याने त्यांना थेट मोतीलाल नगरमध्ये  बांधलेल्या  इमारतीत  तीन हजार ६२८ कुटुंबे त्यांच्याच नव्या फ्लॅटमध्ये ते राहण्यास जातील, असे यावेळी स्पष्ट केले.
या मायक्रो सिटी प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन म्हाडाकडून केले जाणार आहे. म्हाडाला नियोजन प्राधिकारणाचा फर्जं लाभल्याने मुंबई महापालिकेच्या परवानगीची गरज नसल्याचे मधु चव्हाण यांनी स्पष्ट केले. यामुळे मोतीलाल नगरच्या महात्त्वकांशी प्रकल्पाच्या कामाला वेग मिळेलच परंतु हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. पुनर्विकास कामातून म्हाडाला सुमारे १८ हजार अतिरिक्त घरे मिळणार असू त्यांच्या विक्रीतून म्हाडाला २० हजार कोटींचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!