गोल्डन पार्क रुग्णालयात सुरु होत आहे जगातील पहिल अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र

वसई (प्रतिनिधी) : पाठ दुखी, मणक्याचे आजार आणि त्यावरील आजची आधुनिक तंत्रज्ञान युक्त इंडेस्पाइन शस्त्रक्रिया हे अधिक सुश्म व अभ्यासू पणे पोचवण्यासाठी वसईतील गोल्डन पार्क रुग्णालय येथे अत्याधुनिक प्रशिक्षण सेंटर सुरु होत आहे (डॉ.गोरे इंडोस्पाईन सेंटर ऑफ एक्सलन्स ट्रनिंग सेंटर). या प्रशिक्षणासाठी परदेशातुन पहिल्या पाच जाणांची बॅच डिसेंबर मध्ये दाखल होणार आहे, विशेष म्हणजे जगातील पहिले सेंटर हे गोल्डन पार्क रुग्णालय असणार आहे.

मणक्यांच्या आजारांवरील उपचार ; नेमके निदान होणे शक्य

मणक्यांचे आजार म्हटले की, त्याला विविध उपचार उपलब्ध आहेत. अगदी नेहमीच्या गोळयता औषधांपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत उपचार यामध्ये समाविष्ठ होतात. पाठदुखी अथवा मणक्याचा आजार असणारी व्यक्तीला हे सर्व उपचार पडताळुन पाहत असते. अमुक व्यक्तीने हे सांगितलं तमुक व्यक्तीला  त्याचा गुण आला अशा प्रकारे, त्याची कारण आणि आजाराची स्टेज याचं योग्य ते निदान करुन उपचार करण सष्ट असतं.

पाठीच्या मणक्यावर वेदनारहित अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली ही आधुनिक तंत्रज्ञान युक्त आणि बऱ्यापैकी गनिती शस्त्रक्रिया अशी ही इंन्डेस्कोप प्रणाली रुगणांना यातून दिलासा मिळेल यासाठी या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून याठिकाणी प्रशिक्षण घेणारे डर्ॉक्टस अधिक कार्यकशम होण्यासाठी हे ट्रेनिंग सेंटर मोलाचे काम करणार आहे.

भारतात प्रथमच सुरु झालेला एंडोस्कोपिक स्पाइन हा नवा अभ्यासक्रम आता मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी जून मध्ये नवी मुंबईच्या एम.जी.एम रुग्णालय म्हणजे महात्मा गांधी रुग्णालय येथे संपन्न झाली व आजही त्या ठिकाणी स्पाइन सर्जरीचे टाके विरहीत शास्त्राचे जनक आशिया खंडातील नामवंत डॉक्टर सतिश गोरे यांच्यता नेतृत्वाखाली डॉक्टर मालक्म पेस्तजी यांनी हा वसा घेतला आहे. डॉ.माल्कम यांनी एक विडा उचलला असून संबंध भारत भर विविध राज्यात आज डॉ.माल्कम हे आपल्या सहाकार्या समवेत एम्स संस्था (दिल्ली,डेहराडून) मधील मेडिकल कॉलेज असो अथवा मुंबई आणि त्याच्या बाहेर डॉ.माल्कम हे आज एम.जी.एम च्या माध्यमातून प्रोफेसरची भूमिका बजावत आहेत.

भारत आणि परदेशातून प्रशिक्षणासाठी येणार डॉक्टर्स

वसईतील या ट्रनिंग सेंटर मध्ये भारत व परदेशातून मेडिकल काऊंन्सिलच्या परवानगीने अत्याधुनिक तंत्रज्ञान, एॅडमिट ची गरज नाही. लोकल भूल आणि खास करुन टाके विरहित अशी इंडोस्पाईन शस्त्रक्रिया संबधी ती कशी व नेमके निदान शोधून करावयाची असल्याचे प्रत्यक्षात प्रशिक्षण दिले जाणार आहे. खास करुन या सेंटर मध्ये ऑर्था, न्यूरॉलॉजिस्ट आणि पेन मॅनेजमेंट संबंधित डॉक्टर्सनाच  मेडिकल कॉन्सिल आणि मिशन स्पाइन संस्थाच्या परावनगीने प्रवेश मिळणार आहे. यामध्ये सेंटर मध्ये दर नव्या तंत्रज्ञानाच्या साहायाने अगदी सवळतीच्या दरात ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

 

केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आरोग्य बाबत उदासीन !

आरोग्य विमा बाब आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे मात्र या इंडोस्पाइन शस्त्रकित्रयेसाठी केंद्र व महाराष्ट्र सरकार अजिबात अनुदान देत नाही. याउलट भारतात केवळ राजस्थान व केरळ हि दोन राज्ये या सर्जरीसाठी 27 हजार, 32 हजार आणि 85 हजार रुपये विमा राशी देते. यामध्ये सत्यवान भामाशाह आरोग्य विमा ही योजना अत्यंत अघाडीवर आहे. त्यामुळे भारता सारख्या प्रगत आणि बलाढय आणि लोकशाही देशांमध्ये महाराष्ट्र जरी अग्रेसर असला तरी महाराष्ट्र राज्य आपल्या आरोग्य सेवेच्या बाबात कुठलेही धोरण अद्याप करु शकला नाही.

साऊथ कोरिया या शस्त्रीयेच्या प्रशिक्षणात आघाडीवर

जगात साऊथ कोरिया मध्ये अशा प्रकारचे इंडोस्पाइनसाठी ट्रेनिंग सेंटर आहे परंतु याठिकाणी एॅडमिशन घेणाऱ्या नवोदित किंवा प्रक्टिस करणाऱ्या डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान शिकवले जाते. दाखवलं जाते, मात्र कुठल्याही प्रकारची सर्जरी किंवा रुग्णांना हात लावायला देत नाही परंतु या सेंटर आणि 6 महिन्यांच्या कोर्स प्रत्यक्षात प्रशिक्षितला सर्जरी करायला मिळणार आहे हे विशेष.

आज या शस्त्रक्रियेला भारतात हि राजमान्यता मिळाली ;अमेरिकेत तज्ज्ञ डॉक्टरांना 20 टक्के वाढीव कमिशन

इंडोस्पाइन सर्जरीसाठी अमेरिकेचे उद्हारण घेतल तर गंभीर शस्त्रक्रियेला 2016 पर्यंत राजमान्यता नव्हती परंतु आज दिनांक रोजी या देशाने या गंभीर शस्त्रक्रियेला डोक्यावर घेतले असून अमेरिका सरकार त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांना हि शस्त्रक्रिया केल्यावर 20 टक्के कमिशन देते हि बाब महत्वाची आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!