ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा

मी अविवेकांची काजळी । फेडूनि विवेक दीप उजळी ।

तै योगियांपाहे दिवाळी । निरंतर ॥

बाबा सदानंद महाराज आश्रमाद्वारे ‘ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक  पारायण सोहळा’ गणेशपुरीत नित्यानंद  स्वामी महाराजांच्या पवित्र श्रीक्षेत्र प्रागणांत नुकताच पार  पडला. ज्ञानेश्वरी पारायणाचे हे ४२ वे वर्षे. ज्ञानेश्वरी भावकथा महायज्ञ सांगताना ह.भ.प. सर्वेश्वरताई भिसें म्हणाल्या, ‘भगवंताची पुजा करणे, पंचाअमृत स्नान घालणे, गोपिका चंदन लावणे, पिवळे वस्त्र अर्पण करणे वैजयंतीलामाला अर्पणे तसेच मानसपुजा करणे हे होय !’ करावीतीपुजा मनाची उत्तम ‘माझी देवपुजा पायतुझे सदगुरु राया !’ येथेच गोपाळकृष्ण बसलाय ! माझ्या मनात नित्यस्मरण तुझे राहो ! देवा माझे मन लागो तुझ्या चरणी ! तुझे नामस्मरण घडो, संत समाधान लाभो भजन चरणी मन एकाग्र होओ, माझ्या दृष्टीसमोर तुझेच स्वरुप असावे. डोळे भरुनी पाही तुझी मुर्ती, श्रध्देचा भाव अंतकरणात असू घ्यावा ! जीवे भाव नाही तेथे काही उपयोग होत नाही. ज्याने आपले मस्तक सद्गुरु चरणी अर्पण केले असे आपुले बाबां. भगवंताशी आपली पारदर्शकता कायम राहिली पाहिजे, स्वत:ला भगवंतापाशी प्रगट होणे आहे तरचं आपण सांगु शकतो की, तुझ्या पध्दतीने माझ्यात परिवर्तन कर ! ‘अवगुणाचे चिंत्त ना धरो’ मला  तुझ्या योग्य तू बनवून घे ! मैं एेंसी बन जाउँ जो तेरी मर्जी है । जैसे तुम चाहते हो वैसे हमे बनाओ । हनुमंताची जशी दासभक्ती तशीच भक्ती माझ्याकडून नेहमी घडू दे । राम करे मनो करें विश्वास । देव माझा मी देवाचा प्रत्येक श्वासाचीखबर  त्यास  दिली गेली पाहिजे. बोलणेची नाही आता देवा विणा काही नाही आम्ही  भगवंताचे नाम सोडू शकत नाही. गोपिका भगवंताशी एकरुप झाल्याने कोटी कोटी भूललीनारी देखिले डोळा बैसला. तुका म्हणे तुझ सोडविलं कोणी एक चपाणी. परमात्याचे भजन हे जीवनाचे सार आहे. सद्गुरु जेथे आहेत तेथेच भगवंत आहेत. तुका म्हणे नरधारी भोंग भोगोनी ब्रह्मचारी. तुकडोजी महाराज म्हणतात, ‘संसारी असावे असोनी नसावे भजन करावे सर्वकाळ. आज बाबांची संगत लाभली निरंतर भाग्य लाभले.’

खातनाम भजन सम्राट रायगड भुषण श्रीयुक्त निवृत्तीबुवा चौधरी पनवेल यांनी भजने गाईली १) उठता बसता चालता बोलता राम म्हणा, २) हाती काठी काळी घोंगडी लागला धेनूचिया पाठी, राधे तुझा कृष्ण हरि दहीदुधाची करतो चोरी. ह.भ.प. देवानंद शेट्टी (कल्याण) हयांचे भजन झाले, प्रथमतुला वंदीतो गजानना पंढरी निवास सख्या पांडुरंग, माझे मोहर पंढरी आहे भीमातीरी, हरि म्हणा कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा घनश्याम म्हणा. ह.भ.प. मोतिराम बुआ, नंदकुमार जाधव, यशवंत चौधरी (नालासोपारा) हयांचे ही गायन झाले. रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, पुंडलिकासाठी उभा विटेवरी, एैसा देव भक्तिचा भुकेला.

ह.भ.प. श्री महादेव बुआ शहाबाजकर व पाटीलताई हयांनी कर्नाटकी भजने गाईली. तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवां, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवू निया, जानकी बल्लभ दशरत वंल्लभ, अप्पार महिमा श्री पुरंदर विठ्ठल, धन्य धन्य दिन तुमचे झाले तप दर्शन. ह.भ.प.पुरुषोत्तम म्हात्रे महाराज त्यांच्या मुखातुन ज्ञानेश्वरी  अमृत पाझरत असते ते राम नाईक हयांचे स्वागत करतेवेळी म्हणाले, ‘पारायणाच्या सांगत्या सोहळयांस मुख्यअतिथी  आमदारकी पासून  माजी पंट्रोलियम मंत्री, माजी केद्र्रींय रेल्वे राजयमंत्री, व उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल श्री. रामभाउँजी नाईक साहेब, हे दिपप्रज्वलनासाठी समाजमुख कार्यकर्ते आपणास पाहुणे म्हणून लाभले आहेत. वेगवेगळया क्षेत्रातील  मान्यवरविश्वस्त, जाणकारअभ्यासक व अनेक आमदाराची  उपस्थिती प्रार्थनिय व वंदनिय आहे. आमदार राजेश पाटील, आमदार शांताराम भोर,आमदार  क्षितीज ठाकूर, ज्योतीताई ठाकरे , भायंदर येथील कॉलेजचे विश्वस्त रोहीदासजी पाटील, भायंदर- मिराचे माजी उपमहापौर प्रविणजी पाटील, वसई  महानगर पालिकेचे सभापती यज्ञेश्वर पाटील,  राजू पाटील इत्यादी. पंढरपूर वारकरी संप्र्रदायाचे फडकरी अध्यक्ष श्रीमान्  ह.भ.प. शिवणकरजी महाराज, ह.भ.प. सर्वेधरताई भिसें शेंगाव, ह.भ.प. पुरुषोत्तम म्हात्रे महाराज, प्रभूराज महाराज, ह.भ.प. विठ्ठल देसाई महाराज, ह.भ.प. विश्वनाथ वारिंगे महाराज, ह.भ.प.कबीर महाराज, ह.भ.प. वायलें महाराज, ट्रस्टी गुरुनाथजी भोईर असे मान्यवर व्यासपिठावर बाबां समवेत स्थानपन्य असल्यामुळे व्यासपिठ बहरुन फुलून गेले होते.

हया कार्यमाचा थोडक्यांत वृऱ्तांत असा की, आश्रमातून ज्ञानयज्ञाचे  उपम राबविले जात असल्याकारणाने पाहुण्यांकडून आश्रमकार्यांवर स्तुती सुमने वाहिली गेली. भागवतकथा प्रवक्ता ह.भ.प. सर्वेश्वरताई भिसें म्हणाल्या, ‘ पारायणाचे हे ४२ वे वर्षे म्हणजे बाबांनी भक्तांच्या ४२ कुळाच्या पिढयांचा उध्दार केला जणू. भक्तांच्या उध्दाराचा वसाच घेतलाय जणू. हया कार्यमात अनंतकोटी प्रमाणदाखले पाहाण्यास मिळतात. बाबांचे स्मितहास्य हेच आनंदाचे प्रतिक असल्याने ही उर्जा हृदयी तुमच्या सत्त् तेवत राहों ! ‘  आश्रमाद्वारे बालसंस्कार शिबीराचे दरवर्षी नियोजन असते त्याचे हे तेरावे वर्षे. हयात ५ वर्षीय बालिका तेजश्वनी योगीराज इंगुळकर हिने गीतेतील १६ व्या अध्यायातील सर्व संस्कृत श्लोक मुखोद्वार  बोलिले. संतमंहताच्या जिवनावरिल संदिप पुजारी, रुद्रा शेट्टी हयांच्या मल्लाळम भाषेतील पुस्तक प्रकाशनाचा कार्यम रामभाउँजीच्या हस्ते पार पडला.

पंढरपुर वारकरी संप्रदायाचे फडकरी अध्यक्ष श्री.ह.भ.प. शिवणकरजी महाराजांनी भक्तांना संभोदिले, ‘मी वारकरी मंडळाचा अध्यक्ष हया नात्याने सांगु इच्छितो की, जुने गेल्याशिवाय नव्याची निर्मिती होत नाही, हया करिता आपण एकमेकांच्या हातातहात घालून पुढील वाटचाल करुया ! अन्यायाविरुध्द उभे राहून पुन:श्च आश्रमाची नवीन उभारणी करु या ! आश्रम  ज्यांनी पाडला त्याच्याचकडून पु:न्हा  बांधून घेतला जाईल !’

राम नावाला जागणारे माजी राज्यपाल रामभाउँजी नाईकसाहेब हे बाबांच्या मदतीला धावुन आले. ते भक्तांना सभोदित करताना म्हणाले, ”बालयोगी सदानंद महाराज हे भाविकांच्या भक्तिचे श्रध्दास्थान आहेत. सत्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयापुढे जाईन. मी माजी कायदामंत्री शांतीभूषण हयांना साकडे घातले. मी उत्तरप्रदेशाचा माजी राज्यपाल हया नात्याने दोन गोष्टी सांगु इच्छितो, ‘एक कुंभमेळयाची सर्व व्यवस्था व दुसरे गंगेचे शुध्द  पाणी  सर्वास शुध्द मिळत आहे. योगी समितीकडून ‘प्रयाग’ हे नावे झाले तसेच माझ्या कडून रामजन्म भूमीचा ‘अयोध्या जिल्हा’ झाला. मी बनविलेल्या जिल्हातच राममंदिर उभारणार ! आपण सर्वांनी एकमुखाने हातात हात घालून चालत राहू या ! चालत रहा म्हणजे एकदिवस सत्याचा  मार्ग नक्कीच आपणाला सापडेल. शरयवती, शरयवती, हया माझ्या पुस्तकात हेच विचार मी मांडले आहेत हयाचा उल्लेख मी करु इच्छितो. म्हणून सर्वांनी एकदिलाने काम करुया ! आशीर्वाद देण्यारा महात्मा येथेच बैसले आहेत. ज्याप्रमाणे मधुमाला मध गोळा करते, जसा सुर्य सकाळपासून संध्याकाळ पर्यंत चालत राहतो म्हणून तो जगदवंदनिय ठरतो. माजी राज्यपालाच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. भक्तीमार्ग हा अंधारातून प्रकाशकडे जाण्याचा मार्ग आहे. बाबांच्या मुख्यातून ज्ञानदेवाच्या ओविच्या  मंत्र घोषाने दीप प्रज्वलन झाले.

मी अविवेकांची काजळी । फेडूनि विवेक दीप उजळी ।

तै योगियांपाहे दिवाळी । निरंतर ॥

दीपाचेनि प्रकाशे गृहांचे व्यापार जैसे ।

देही कर्मजात तैसें । योग युक्ता ॥

॥ बाबाराम ॥

लेखक : जगदिश रघुनाथ भोईर

बोरिवली (पुर्व), मुंबई.

मो. नं. 9833714839

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!