ग्रामपंचायतीच्या नेहमीच्या हुकूमशाही कार्यपद्धतिमुळे अर्नाळावासी त्रस्त

विरार (वार्ताहर) : ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना देखील जुलमी निर्णय ग्रामस्थांवर लादुन फॅक्टरीपाड्यातील प्रभात काॅलनीच्या गेटजवळ असलेली कचराकुंडी जबरदस्तीने
ब॔द करण्याच्या ग्रामपंचायतीच्या निर्णयाविरोधात परिसरातील नागरिकांकडुन ग्रामपंचायतीस निवेदन पत्र देण्यात आले.

अर्नाळा ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करुन बांधलेली अभ्यासिका वर्षभरापासुन अशीच ओस पडली आहे, त्याबाबत ग्रामपंचायतीचे काहीही नियोजन दिसत नाही. अर्नाळ्यातील मुले विरार, आगाशी येथील ग्रंथालयात जात आहेत. त्याकडे ग्रापंचायत जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायतीच्या गाळ्यात दोन वर्षापूवीं असलेले अर्नाळा ग्रंथालय या संस्थेचे वाचनालय व ग्रंथालय ग्रामपंचायतीने कटकारस्थानाने बंद पाडले. आणि आता या ग्रामपंचायत प्रशासनाला ही कचराकुंडी बंद करुन या ठिकाणी वाचनालय सुरु करण्याचे कसं काय सुचले ? हा मोठा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता ग्रामस्थांवर लादलेला हा निर्णय पुर्णत: चुकीचा आहे, असं ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदन पत्रात म्हटले आहे.

तसेच ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असलेले वाचनालय व ग्रंथालय बंद करणाऱ्या आणि लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या अभ्यासिका सुरु करण्याचे सोडुन कचराकुंडीत वाचनालय सुरु करण्याचे कारस्थान करणाऱ्या अर्नाळा
ग्रामपंचायतीच्या हुकुमशाही कार्यपध्दतीचा जाहिर निषेध पत्रात करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या या नेहमीच्या हुकुमशाही धोरणामुळे अर्नाळ्यातील जनता त्रस्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!