ग्रीन गणेश अभिनव कल्पना

वसई (प्रतिनिधी) : निसर्ग रक्षणाचा दिवस साजरा करीत असताना माणसाच्या प्रत्येक कृतीतून निसर्गालाच देवत्व बहाल करुन पर्यावरणाचा समतोल कसा साधला जातो, याचे उत्तम उदाहरण विरार येथील एक कलावंत परेश घाणेकर यांनीआपल्या गणेश मूर्तीच्या अभिनव कल्पनेतून घालून दिले आहे.

अलिकडे पर्यावरण पूरक गणपतीच्या मूर्तींना प्रचंड मागणी असताना शाडूच्या आणि लाल मातीच्या मूर्ती अनेक अडचणींवर मात करुन मूर्तीकार महाराष्ट्रात घडवित आहेत. लाल माती ही पर्यावरण पूरक असली तरी तिला बी रुजवून मूर्तीच्या विलयानंतर तीचा कल्पकतेने झाडांना खत म्हणून उरलेल्या मातीचा वापर करण्याची कला या मूर्तीतून साधण्यात आली आहे.

कोरोना संसंर्गाच्या काळात श्री गणेशाच्या उत्सवाला मर्यादा आल्या असून मूर्तीचे आगमन आणि विसर्जन यासाठी मिरवणुकांवर बंदी आहे. येणाऱ्या गणेशोत्सवात ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केवळ शाडूच्या पर्यावरण पूरक मूर्ती बनविणे पुरेसे नाही तर ही मूर्ती कृषी पर्यावरणाला कशी पूरक ठरेल हे पाहणे देखील महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन ग्रीन गणेश या संकल्पनेतून बनविलेल्या मूर्तीत विविध झाडांच्या बिया मिसळण्यात आल्या असून गणेशोत्सवानंतर ही मूर्ती घरच्या घरी एका मोठ्या टबमध्ये विसर्जित केल्यावर मूर्तीची माती विरघळते व तिचे खतात रुपांतर होते, व हे खत कृषी लागवडीसाठी वापरण्यात येते.

घाणेकर यांच्या या अभिनव कल्पनेचे स्वागत होत असून या ग्रीन गणेशाला आत्तापासून प्रतिसाद वाढत असून या मूर्तीला मागणी आहे. संपर्क – www.green-ganesha.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: