चक्रेश्वर मंदिरासमोर भर रस्त्यात महिलेला लुटले

वसई (वार्ताहर) : पौराणिक चक्रेश्वर मंदिरासमोरील रस्त्यात एका वृध्द महिलेला लुटण्यात आल्याची घटना भरदिवसा घडली आहे.त्यामुळे महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील चाण्यनगरीत राहणाऱ्या राजश्री चव्हाण (59) या सोपारातील आठवडा  बाजारात गेल्या होत्या.तिथून 11 वाजता चर्केश्वर मंदिराजवळून परतत असताना,दोन इसमांनी त्यांना अडवले.आमचा सेठ पुढे साडया वाटत आहे.तुम्ही दागिने काढून पर्समध्ये ठेवा अशी बतावणी करून त्यांनी राजेश्री यांच्याकडील दागिने काढून घेतले ते त्यांच्या पर्समध्ये ठेवण्याची अभिनय करून ते निघून गेले.पुढे आल्यावर राजेश्री यांना आपली फसगत लक्षात आली.त्यांनी घरी येवून हा प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला.त्यानंतर नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. राजेश्री यांच्या अंगावरील सुमारे 90 हजारांचे दागिने अज्ञात इसमांनी लुटून नेले.

सोपारा गावात बुधवार आणि रविवारी आठवडा बाजार भरतो.या बाजारात उमराळे, चाण्यनगरी, नाळे, समेळपाडा, सोपारा, गास येथील हजारो नागरिक खरेदीसाठी जातात. उमराळे, चाण्यनगरी आणि नाळेतील नागरिक त्यासाठी चक्रेश्वर मंदिरासमोरील रस्त्याचा वापर करतात.हा रस्ता सायंकाळची वेळ वगळता नेहमीच निर्मनुष्य असतो.त्याचा फायदा घेवून राजेश्री चव्हाण यांना चोरटयांनी आपले सावज केले.त्यामुळे या परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!