चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सण अग्रीममध्ये वाढ

  • दिवाळीला मिळणार १२,५०० रुपये
  • थकीत ९ महिन्याचा महागाई भत्ता नाही
मुंबई : जयंत करंजवकर
चतुर्थ श्रेणी आणि ज्या कर्मचा-यांची १४,८०० रु. पेक्षा जास्त नाही अशा कर्मचा-यांना यंदाच्या दिवाळीला    १२ हजार ५०० रुपये सण अग्रीम मिळणार आहे. यापूर्वी या कर्मचा-यांना १० हजार रुपये मिळत होते.  मात्र जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्याचा महागाई भत्ता राज्य सरकारने जाहीर न केल्याने कर्मचा-यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ऐन दिवाळीच्या सणासुदीला सरकारने कर्मचा-यांच्या तोंडाला पाने पुसल्या बद्दल मुंबईचे राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी खेद व्यक्त केला. निदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती असे त्यांनी सांगितले. महागाई लक्षात घेता साडेबारा हजारात कपडे आणि फरालालाही हा सण अग्रीम अपुरा आहे. राज्य सरकारने निदान २४ हजार रुपये कर्मचा-यांना दिले असते तर त्यांची दिवाळी मनासारखी झाली असती. या सण अग्रीमची रक्कम सरकारकडे वर्षभरात जमा होणार होती. त्यामुळे सरकारचे काहीच नुकसान होणार नव्हते, असे मिलिंद सरदेशमुख यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने जाहीर केलेला हा सण अग्रीम दिवाळी सणाबरोबर रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नाव वर्ष, संवस्तरी, रोष-होशन, बुद्ध जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, डॉ. आंबेडकर जयंती या सणाला व विशेष दिनालाही मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!