चिंता मिटली ; वसई-विरार हद्दीतील धरणांत 47.43 टक्के मुबलक पाणीसाठा

वसई (प्रतिनिधी) :  पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी-टंचाईला सामोरे जावे लागत असताना इथे जिल्ह्यातील एकमेव महापालिका असलेल्या वसई-विरार महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा करणाऱ्या तीन ही धरणांत पाण्याचा मुबलक व समाधानकारक साठा असल्याची महत्वपूर्ण माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या शहर अभियंताकडून प्राप्त झाली आहे.

पालघर सहित वसई तालुक्यातील या तीन धरणांचा एकूण साठा मिळून 47.43 टक्के इतका असल्याने मे -2019 च्या अखेर पर्यंत वसईकर नागरिकांची पाण्याची मोठी चिंता मिटलेली असेल, असे हि पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. वसई, नालासोपारा,विरार, नायगाव ही चार शहरे आणि ग्रामीण भाग वसई विरार महापालिका हद्दीत येतात. वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करता यावे, या प्रयोगात पालिका यशस्वी झाल्याने यंदा धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंताकडून सांगण्यात आले.

वसई -विरार शहराला सूया-धामणी धरणातून 100 एमएलडी, सूर्या टप्पा -3  मधून 50  एमएलडी तर उसगाव मधून 20 एमएलडी आणि पेल्हार मधून 10  एमएलडी पाणी प्रतिदिन उचलायला मिळत असते. मागील वर्षी पाण्याची टंचाई भासली होती. तशी यावेळी सुध्दा जुलै -2018 व सप्टेंबर नंतर पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडला नाही. परंतु यंदा पालिकेने पाण्याचे उचित असे नियोजन केल्याने व अमृत योजना हि बऱ्यापैकी कार्यान्वित झाल्याने यावेळी धरणात पाण्याचा साठा समाधानकारक रित्या आहे. याउलट बहुतांशी गंभीर स्थिती पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असून जिल्ह्यातील अनेक गावांना अजून हि पुढील दोन महिने मोठया पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. . तीन धरणातील मार्च अखेर पर्यंत शिल्लक आकडेवारी सूर्या व सूर्या टप्पा-3 म्हणजेच धामणी धरणातील सध्याचा पाण्याचा साठा 131.071 घनमिलि मीटर इतका असून अदयाप एकूण 47.43टक्के पाणी धरणात शिल्लक आहे. यात उसगाव धरणात 1.448 घन मिलिमीटर म्हणजेच 29 .19 टक्के इतका पाण्याचा साठा शिल्लक असून पेल्हार धरणात 1.051 घन मिलीमीटर म्हणजे 29.52 टक्के पाणी साठा शिल्लक आहे.

वसई- विरार शहराला मुख्य अशा सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी,उसगाव आणि पेल्हार धरणाच्या माध्यमाने नियमित पाणीपुरवठा होतो.त्यातच मागील वर्षीपासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद करण्यात आले आहे.मात्र त्याचा काही फार असा फरक पडणार नाही. त्यामुळे या मुख्य अशा तीन धरणातून अजून हि पुढील 60 दिवस म्हणजेच मे-2019 च्या अखेर पर्यंत नियोजन पध्दतीने वसईतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

वसई-विरार पालिकेला दररोज 180 एमएलडी पाणी या तीन धरणातून उचलायला मिळत असून हे पाणी विविध भागातून मुख्य जलवाहिनीद्वारे नागरिकांना पोचवले जाते. दरम्यान कडक उन्हाळयात जिल्हाच्या ग्रामीण व शहरी भागात पाण्याची मोठी पंचायत आहे.त्यातच आपल्या शहरी भागात पाणी पुरवठा करणारी तीन धरणे असून त्यात आज मार्च अखेर पर्यतही समाधानकारक पाण्याचा साठा उपलब्ध आहे,त्यामुळे रोज 180 एमएलडी पाणी वसई विरार महापालिका हद्दीतील नागरिकांना नित्याने मिळेल व ते मे अखेरी पर्यंत हा साठा राहील अशी महत्वाची माहिती उपलब्ध झाल्याने तूर्तास तरी पुढील 15  मे पर्यंत वसईकरांना.पाणीकपातीला सामोरं जावे लागणार नाही त्यामुळे नागरिकांनी सुटेकचा निश्वास टाकला आहे.

दोन योजना-मुळे मिळाले यश..मात्र वसई -पालघर मध्ये पाण्याचे हाल

वसई- विरार महापालिकेने सूर्याच्या दोन योजना राबविल्या, यात सूर्या व टप्पा -3 व आताची अमृत योजना राबविण्यात आली असून पेल्हार व उसगाव धरणाचा यात मोठा आधार मिळाला आहे.

त्यात यंदा अमृत योजना हि काही ठिकाणी सुरु झाल्याने आता पावसाळयात केलेला पाण्याचा साठा अगदी व्यवस्थित असल्याने उन्हाळयात मात्र नागरिकांना मोठया पाणी टंचाईची झळा अथवा पाणीकपातीचा सामोरं जावे लागणार नाही,  आणि हे जरी वास्तव असले तरी मात्र पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचे खूप हाल असून काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात असून त्यात हि सातत्य नाही.उदा द्यायचे झाले तर वसई -विरार पालिकेच्या काही भागात अजूनही पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.यात खास करून कामण पूर्वेला तर नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!