चिकू सायडर वर अतिरिक्त लाभ वाढविण्यासाठी मुख्यमत्र्यांना निवेदन

पालघर (प्रतिनिधी) : गेल्या वर्षीपासून डहणूमध्ये चिकू सायडर तयार करणाऱ्या तसेच द्राक्ष मधून वाइन तयार कारणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य उत्पादनावरील फायदे वाढविण्यास यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. डहणू ही राज्यातील एकमात्र केंद्र आहे जिथे चिकू सायडर इतर फळांसह बू्र केले जाते.

डहणुमध्ये एका चिकू वाइनरी चालवणारी प्रियंका सवे व इतर शेतकरी सी.एम फडणवीस यांना भेटले होते आणि त्यांनी चिकू वाइनला 100 टक्के एक्साइज डयुटी देण्याची विनंती केली होती, जे सध्या द्राक्ष वाइन ब्रुअर्सपर्यंत मर्यादित आहे. द्राक्ष पासुन तयार केलेल्या वाइन वर एक्साइज डयुटी नाही, तर चिकू वाइन ब्रॉअर्सना (व्हॅट-मूल्यवर्धित कर) सह 100% कर आकारणी केली जाते. आम्ही डहाणू-घोलवाड येथून आमच्या उत्पादकांकडून चिकू विकत घेत आहोत आणि आमचे प्लांट येथे ब्रू सायडरची पहिली बॅच सप्टेंबर आणि 2017 मध्ये मुंबई आणि पुणे मार्केटमध्ये प्रवेश केली आहे. प्रियंका यांचे वडील प्रभाकर सवे यांचे अनेक चिकू बाग आहेत आणि उत्पादन करण्यासाठी ते जैविक शेती पध्दती वापरतात .

प्रियंका चे पती नागेश पाई अधिका माहिती देताना म्हणाले की , ”2001 मध्ये द्राक्ष वाइन बु्रअर्सना, वाइन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि द्राक्षाच्या शेतकर्यांच्या फायद्यासाठी सवलत देण्यात आली होती. महाराष्ट्रात विविध फळांपासून तयार केलेले हे मद्यसाठी द्राक्ष प्रमाणेच सवलत द्यायला हवे, तरच आपल्या शेतकऱ्यांना स्वत:च राज्यातील बाजारपेठेत खात्री पटेल. मॅग्नेटिक महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसी2013 मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ‘डी’ झोनमध्ये होणाऱ्या उद्योगातील विविध फायदे देखील चिकू वाइनरीज पर्यंत वाढविल्या पाहिजेत.” सध्या आपल्या बु्रअरीत आम्ही सिडर स्टारफ्रूट (डहाणू),आंबा (विशेषत: रायगडाहून मिळवलेला), सिंधुदुर्ग येथील अननस पासुन तयार करतात. पण  मुंबई व पुणे वाइन मार्केटमध्ये चिकू सायडर हे लोकप्रिय आहे.

कृषी उत्पादनाच्या प्राथमिक प्रक्रियेसाठी नॅशनल हॉर्टिकल्चरल बोर्डच्या अंतर्गत आम्ही सब्सिडीसाठी देखील अर्ज केला होता, असेही त्यांनी सांगितले. हे कृषी उत्पादनाची प्राथमिक प्रक्रिया असू शकत नाही असे म्हणणे नाकारण्यात आले. वाईन बनविण्याच्या प्रक्रियेत फळाचा रस काढण्यामागे फर्ममेंटेशनचा समावेश आहे, असे पाई म्हणाले. जवळजवळ सर्व वाइन उत्पादक शेतीचा विस्तार म्हणून वाइन बनविण्याचा विचार केला आहे आणि बहुतेक वाइनरी शेतातल्या जवळपास आहेत. चिकू सायडर बनवताना आम्ही  साखर टाकु शकत नाही, कारण चिकू सायडर मध्ये नैसर्गिक साखर असते.

चिकू हा 365 दिवसांचा पीक आहे, व डहाणू-घोलवड हा मुख्य भाग आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पीक हंगामात दररोज उत्पादन 250 टन होते, तर जुलै ते ऑॅक्टोबर दरम्यान उत्पादन दर दिवशी केवळ 70 टन असते. डहाणू ही भारतातील एकमेव केंद्र आहे, जेथे चिकू सायडर तयार केले जाते, परंतु शेतकरी उत्पादनात वाढविण्याच्या फायद्यांसह एक्साइज डयुटीत कर माफीची मागणी करीत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!