चित्तथरारक व आकर्षक कसरतीनी ‘एरोमॉडेलिंग शो’ रंगला

वसई : संजीवनी परिवार वसई तर्फे आयोजित एरोमॉडेलिंग शो सुखोई, राफाएल तेजस,  ट्रेनर विमान,  तरंगणारी ग्लायडर उडती तबकडी, बॅनर टोइंग इत्यादी विमानाच्या आकर्षक व थरारक कसरतीने उत्तरोत्तरछान रंगत गेला. विमान उड्डाण कसं करत, हवेत तरंगत कसं राहते कोलांटया उड्डया मारताना पाहून विद्यार्थी मंडळी हरखुन गेली. प्रात्यक्षिकाचं उदघाटन महानगर पालिकेचे प्रभाग सभापती श्री निलेश देशमुख ह्यांच्या हस्ते करण्यात आले. हीप्रात्यक्षिकं ममावती क्रीडा मंडळ सत्पाळेच्या मैदानावर झाली. लिटल विग्स इंडियाच्या श्री सदानंद काळे यांच्या मार्गदर्शना खाली अथर्व व अक्षय काळे यांनी कसरतीचं सुरेख दर्शन घडवलं. श्री राकेश वर्मा यांच्या हेलिकॉफ्टर व फाईटर विमानाच्या कसरतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

आपल्या विद्यार्थ्यांनी, मुलांनी क्रिकेट, फुटबॉल, टेनिस इत्यादी छंदाबरोबरच एरोमॉडेलिंग चा छंद जोपासावा त्यातून उद्याचे फाईटर पायलट तयार होतील असं प्रतिपादन सदानंद काळे यांनी केलं. आपल्या रौप्यमोहत्सवी वाटचालीत संजीवनी परिवार सतत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम आयोजित करत असते, विद्यार्थ्यांचं कुतुहूल जागृत करणारा शैक्षणिक उपक्रम म्हणजेच आजचा नाविन्यपूर्ण एरोमॉडेलिंग शो. त्या अगोदर सेंट जोसेफ महाविद्यायातील सभागृहातश्रीसदानंद काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलासुमारे चारशे विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी सोप्या व शैलीदार भाषेत विमान शास्र उलगडून दाखवलं  आणि समर्पक ऊ त्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानांच्या प्रतिकृतींचे संचबक्षिस दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद पाटील ह्यांनी केले तर अध्यक्षस्थान सुभाष वझे होते. सुत्रसंचालन  सुनील म्हात्रे ह्यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपाध्यक्ष आलेक्स परेरा व विल्सन सर उपस्थित होते त्यांनी महाविद्यालयातर्फे सदानंद काळे यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं. कार्यक्रमाची कल्पना मांडणारे व त्यासाठी महत्वाच योगदान देणाऱ्या योगेश पाटील यांचे काळे सरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाला जयप्रकाश ठाकूर, यशवंत पाटील,  प्रफुल ठाकूर,निलेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!