चित्रकार सुभाष गोंधळे ह्यांना “उद्योगश्री गौरव सन्मान” पुरस्कार

वसई : वसईतील सुप्रसिद्ध चित्रकार व जाहिरात तज्ञ मा.सुभाष गोंधळे ह्यांना २०१८ या वर्षीचा अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “उद्योगश्री गौरव सन्मान” पुरस्कार आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योजक मा.श्री. केसरी भाऊ पाटील यांचे हस्ते व कॅम्लिन कोकियो इंडियाचे अध्यक्ष मा.श्री. सुभाष दांडेकर यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुंबईतील जगप्रसिद्ध सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टस येथून पदवी संपादन केली. महाविद्यालयीन जीवनात ह्यांनी अनेक अनेक पारितोषिके मिळवली , तसेच तिसऱ्या वर्षी ते महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सातत्याने रेखाचित्र व निसर्गचित्राची निर्मिती करून अनेक विविध स्पर्धेत व चित्रप्रदर्शनात भाग घेऊन राज्यस्तरीय व राष्ट्रिय स्तरावरील पारितोषिके मिळवली, जाहिरात कंपनीमध्ये अर्धवेळ काम करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मुंबई व दिल्ली येथील प्रसिद्ध जाहिरात संस्थांचा अनुभव मिळवून नंतर त्यांनी वसईत १९८९ साली “सुगो अँडव्हर्टयझिंगची” मुहूर्तमेढ रोवली , भास्कर आळीतील राहत्या घरीच ऑफिस थाटले. ग्राहकाला भेटून रंगीत डिझाईन दाखवणे , त्यातील बदल करणे , टाईप सेटिंग , निगेटिव्ह पॉझिटिव्ह मुंबईला तयार करून आणणे , प्रिंटरकडे पेपर नेऊन देणे , प्रिंटिंग झाल्यावर त्याचे बायंडिग करून त्या बुकांचे गठ्ठे प्रसंगी खांद्यावर वाहून मुंबईहुन वसईला आणणे , ग्राहकांना नेऊन देणे, असे सर्व काम ते स्वतःच करीत असत. असे कष्ट करीत त्यांचा प्रवास सुरू झाला, हे सर्व कारीत असताना गेली ३० वर्ष चित्रकलेची साधना व सामाजिक कार्याची आवड त्यांनी कायम जोपासली.
वसईतील महानगरपालिका, पोलीस स्टेशन, अनेक महाविद्यालये, शाळा, सामाजिक संस्था यांच्या उपक्रमात त्यांचा कायम सहभाग असतो. व्यवसाय , कुटुंब व समाजासाठी काम करीत असताना चित्रकलेचा छंद देखील त्यांनी उत्तम पद्धतीने जोपासला आहे व हेच त्यांचे वेगळेपण असून त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, असे पुरस्काराचे निमंत्रक श्री.भीमाशंकर कठारे ह्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!