जंगलातून होळी आणणाऱ्या आदिवासींवर वन कर्मचाऱ्यांचा हल्ला

वसई (वार्ताहर) : जंगलातून होळी आणण्यासाठी गेलेल्या 5आदिवासी तरुणांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून प्रत्युत्तर दिल्याची घटना घडली आहे.

वसईच्या पुर्व पट्टीतील कामण-बेलखडी येथील आदिवासी तरुण मंगळवारी रात्री 10 वाजता तुंगारेश्वर जंगलात होळी (सुपारीचे झाड ) आणण्यासाठी गेले होते.बुधवारी पहाटे 3 वाजता ते परतत असताना,अचानक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.त्यांना बेदम मारहाण केली जात असताना त्यातील दोघेजण कसेबसे निसटून गावात धावत गेले.या हल्ल्याची घटना त्यांनी सांगितल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी झालेल्या तिघांना दवाखान्यात दाखल केले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आदिवासींना मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल केल्याची बाब समजल्यावर शेकडो आदिवासींनी गोखिवरे रेंजनाका येथील वनविभागाच्या कार्यालयाकडे धाव घेतली.त्यांनी कार्यालयात शिरून प्रचंड तोडफोड केली.कार्यालयातील खर्ुच्या,कॉम्प्युटर,खिडकीची तावदाने त्यांनी फोडली.त्यामुळे येथील वातावरण तंग झाले होते.वालीव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती आटो्यात आणली.त्यानंतर चौकशी करून पोलीसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे.दिवसा कामावर जावे लागत असल्यामुळे आम्ही नागेश तबाले,कमलेश चौधरी,अजय वजरा,मनोज थालकर,मेघनाथ कोंडस असे पाच जण रात्री जंगलात होळी आणण्यासाठी गेलो होतो.जंगलातूनच पारंपारिकरित्या आम्ही होळी आणतो.होळी घेवून पहाटे निघालो असता,अचानक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला.असे अजय वजरा याने सांगितले.

तर आमची चौकशी सुरु असून,त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे वालीव पोलीसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!