जनतेने वस्तुस्थिती जाणून घ्यावी…

राज्यात वीजटंचाईमुळे सर्वसामान्यजन हैराण असून राज्य शासन,या संवेदनशील प्रश्नाकडे गांक्सभीर्याने पाहत नाही,हे खरे तुमचे-आमचे दुर्देव आहे.

गेल्या ५ वर्षांत राज्यात वीजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली,परंतु वीज उत्पादनवाढीसाठी जे प्रयत्न फडणवीस सरकारकडून व्हायला हवे होते,ते झाले नाहीत.किंबहुना,या महत्वाच्या प्रश्नाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्याचे विपरीत परिणाम राज्यातील जनतेला सध्या भोगावे लागत आहेत.वीजनिर्मितीसाठी लागणारा आवश्यक कोळसा व साहित्य खरेदीसाठी आर्थिक निधी उपलब्ध करणे,इ.कामांना प्राधान्य न दिल्यामुळे राज्यात आज अभूतपूर्व वीजटंचाई निर्माण झाली आहे.तसेच या ज्वलंत प्रश्नाचा वापर,स्थानिक पातळीवरील (शीवसेना बीजेपी) सत्ताधारी पक्षाचे लोक,राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करत आहेत.हा “मड्याच्या टाळूवरील लोणी” खाण्याचा प्रकार असून, नागरिकांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.वीजपुरवठा खंडित होणे किंवा लोडशेडिंग करणे,हा महावितरणच्या कल्याणस्थित मुख्यालयाचा अधिकार असतो,तो राजकीय मंडळी वापरू शकत नाहीत.असे असतानाही काही राजकीय मंडळी वैयक्तिक स्वार्थापायी कोल्हेकुई करत जनतेची दिशाभूल करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!