जागतिक अपंग दिनानिमित्त प्रत्येक तालुक्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे – देविदास  केंगार

वसई : अपंग दिव्यांग व्यक्ती (समान संधी,हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 या कायद्यामध्ये सुधारणा होऊन नव्याने अपंग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम2016 (RPWD) हा कायदा तयार केलेला आहे तसेच या कायद्यामध्ये दिव्यांगांसाठी नवीन तरतूदि समाविष्ट केल्या असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामधील या कायद्याची अंमलबजावणी होणेसह जनजागृती सुध्दा होणे गरजेचे आहे.

 तसेच याबाबत अपंग कल्याण आयुक्तालय कार्यालयाने पत्रांमध्ये नमूद केले की पंचायत समिती,जिल्हा परिषद,महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत,यांचे स्तरावर या कायद्याच्या जनजागृती बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्याची संबंधित प्राधिकाऱ्यांना जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या समन्वयाने कार्यशाळेचे आयोजन करावे व अशा कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील / तालुक्यातील अपंग दिव्यांग व्यक्तींच्या संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी सह शासकीय, निमशासकीय व महामंडळे यांचे आस्थापनेवरील कार्यरत कर्मचारी व अधिकारी, अपंग दिव्यांग कल्याणार्थ कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, पालक संस्था ,तज्ञ व्यक्ती,तजज्ञ तसेच सामन्य रुग्णालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये प्रमाणपत्र वितरणाच्या संबंधित विशेष तज्ञ व ईतर कर्मचारी यांना आमंत्रित करावे .याबाबत संबंधित प्राधिकाऱ्यास निर्देश द्यावे.असे अपंग आयुक्तालय पुणे यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

परंतु अद्यापही या कायद्याची कार्यशाळा जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यात केठेही झालेली नाही.याकरिता पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या कायद्याची कार्यशाळा घेण्यासाठी कार्यवाही व्हावी जेणेकरून या कायद्याची जनजागृती होईल आणि सदर कायद्यातील नवीन तरतुदी पासून दिव्यांग वंचीत राहणार नाही.तसेच या कायद्याची अंमलबजावणी व कार्यशाळेचे आयोजन 3 डिसेंबर जागतिक अपंग दिव्यांग दिनानिमित्त पालघर जिल्ह्या सह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात करावी.

याचे निवेदन अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा अपंग दिव्यांग राखीव 3% निधी नियंत्रण समितीचे पालघर जिल्हा सदस्य देविदास जयवंत केंगार व अपंग जनशक्ती संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी पालघर जिल्हाधिकारी व पालघर मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!