जिल्हयातील इ.९ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा चालू करणार – जिल्हाधिकारी

पालघर : पालघर जिल्हयाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देशानुसार दिनांक २३/११/२०२० रोजी पालघर जिल्हयातील इयत्ता ९ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा सुरु करणेबाबत आढावा बैठक घेतली . या बैठकीत शाळा लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी सांगितले.

शासनाचे शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १०/११/२०२० रोजीचे परिपत्रकानुसार या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हयातील लोक प्रतनिधी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. आयुक्त,वसई विरार शहर महानगरपालिका यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार पालघर जिल्हयातील शाळा सुरु करणेबाबत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला.

१) वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र, पालघर, डहाणू, जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड नगरपंचायत क्षेत्र तसेच बोईसर, तारापूर औद्योगिक परिसराचे क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्र यामध्ये दिनांक ३१/१२/२०२० पर्यंत शाळा सुरु करु नये.

२) पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तुर्तास शाळा सुरु करण्यात येऊ नये.

३) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालकांकडून दिनांक ३०/११/२०२० पर्यत संमती पत्र घ्यावे. तद्नंतर शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा.

४) ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार असतील तेथील शिक्षकांनी नजीकच्या आरोग्य उपकेंद्र अथवा CCC Centre येथे RTPCR चाचणी करावी.

५) ज्या शिक्षक /कर्मचारी यांना यापुर्वीच कोरोना झाला आहे त्यांनी तृर्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

६) लक्षणे असलेल्या शिक्षकांनी Antigen चाचणी करावी, चाचणी Negative आल्यास RTPCR चाचणी करावी.

७) ज्या गावात कोविड-१९ चा एकही रुग्ण नाही तेथे शाळा सुरु करण्यात यावी.

८) E-learning सुविधा नसलेल्या ठिकाणी व Mobile Network अडचणी असलेल्या ठिकाणी शाळा प्राधान्याने सुरु कराव्यात. तथापि सदर क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्रात असल्यास शाळा सुरु करु नयेत.

९) पालकांनी पाल्य आजारी असल्यास पाल्यास शाळेत पाठवू नये.

१०) परिस्थितीनुसार शाळेच्या मोकळया पटांगणात शाळा भरविण्याचा प्रयत्न करावा.

११) शासन निर्देशानुसार Sanitation ची प्रक्रीया/ कार्यवाही करावी.

१२) ज्या ठिकाणी शाळा सुरु करण्यास दिनांक ३१/१२/२०२० पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. तेथे पालकांचे संमती घेण्याची कार्यवाही दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी तुर्त सदरहु शाळेतील शिक्षकांनी कोविड-१९ चाचणी करु नये.

१३) शाळा व्यवस्थापन समितीने पालक शिक्षक संघ (PTA) यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा.

१४) जिल्हा आरोग्य अधिकारी / जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी Testing चे नियोजन करावे.

१५) प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये (Containment Zone ) शाळा सुरु करु नयेत.

१६) शाळा सुरु करताना व सुरु झाल्यानंतर शासन परिपत्रक दिनांक १०/११/२०२० परिशिष्ट ‘अ’ व ‘ब’ मधील सुचनांप्रमाणे कार्यवाही करावी. १७) शिक्षकांनी स्वत:ची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत त्या गावातच करावी.

१८) शासन परिपत्रक दिनांक १५/०६/२०२० प्रमाणे संबंधीत ग्रामपंचायतीने आवश्यक कार्यवाही करावी.

१९) आरोग्य विभागाने किमान ५ ते कमाल १० शाळांकरीता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावे.

२०) निवासी आश्रम शाळा, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, समाज कल्याण विभागाअंतर्गत

वसतिगृहे व इतर निवासी शाळा ह्या सुरु करणेबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!