जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फॉर्स ची स्थापना

पालघर : कोव्हीड 19 चा रुग्ण हा गंभीर अवस्थेत असेल तर त्वरित उपलब्ध भीषक हे मुंबई येथील तज्ञांना संपर्क करून मार्गदर्शन घेऊन पुढील उपचार पद्धती ठरवून संबंधित रुग्ण दगावणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. या सर्व बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फ़ोर्स ची स्थापन करण्यात आली असून कोविड-१९ चा मृत्यु दर १ % पेक्षा कमी करण्यासाठी टास्क फ़ोर्स काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फ़ोर्सची स्थापना करण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ शिंदे बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे, वेदांता मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. वाडेकर   भारतीयवैद्यकिय संघटनाचे जिल्हा अध्यक्ष डॉ चव्हाण तसेच आदी सदस्य उपस्थित होते.
दररोज संध्याकाळी उपचार देणाऱ्या डॉक्टरांची बैठक घेऊन रुग्णांच्या स्थितीविषयी चर्चा करण्यात येणार असून अत्यवस्थ परिस्थिती मध्ये असणाऱ्या जास्त वयाच्या रुग्णांवर उपचार पद्धती कुठल्या पद्धतीने चालू आहे,त्याबाबतीतले सर्व नियम पाळले जात आहेत की नाही , याबाबत टास्क फोर्स च्या माध्यमातून आठवड्यातुन दोनदा आढावा घेण्यात येणार आहे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व कोव्हिड रुग्णालयांमध्ये भीषक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्या संस्थांमध्ये भीषक नसतील तेथे खाजगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात येतील रुग्णांना द्यायच्या उपचारांची नियमावली ही पोस्टर स्वरूपात सर्व वॉर्डमध्ये लावण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी उपचार पद्धतीचे नियम पळून नर्स, कर्मचारी यांना कोव्हीड रुग्णावर उपचार करताना उपचार पद्धतीच्या नियमा बाबत मार्गदर्शन करावे. असेही जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक, तथा टास्क फ़ोर्सच्या सदस्य सचिव डॉ. कांचन वानेरे यांनी यावेळी सर्व सदस्यांचे आभार मानले.

कोव्हिड-19 च्या रुग्णांसाठी रुग्णालयाने दिलेल्या सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा (कोविड-19) संसर्ग रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी जिल्हयामध्ये 1) CCC (Covid Care Centre), 2) DCHC (Dedicated Covid Health Centre), 3) DCH (Dedicated Covid Hospital) तयार करण्यात आलेले आहेत. सदर हॉस्पीटल मधील भोजन दर्जा, स्वच्छता, नातेवाईकांसाठी मदत कक्षाची व्यवस्था, सीसीटिव्ही कॅमेरे चालू स्थितीत आहेत का, सदर ठिकाणी वीज व पाण्याची व्यवस्था तसेच Waste disposal व्यवस्थित होते का, हॉस्पीटल मधील सर्व रुग्णांचे अभिलेख व्यवस्थित ठेवले आहेत का, यावर नियंत्रण ठेवणे व इतर अनुषांगिक बाबींकरिता हॉस्पीटलनिहाय समन्वय अधिकारी (Nodal Officer) यांची नेमणूक करण्यात आली असुन या संबंधि आदेश निर्गमित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांनी सांगितले

हॉस्पिटलची व संबंधित समन्वय अधिकारी यांची माहिती पुढील प्रमाणे आहे.

कोव्हिड केअर सेंटर CCC (Covid Care Centre)
उधवा आश्रमशाळा, तलासरी, राजेंद्र चव्हाण, उप अभियंता, सा.बां.उपविभाग तलासरी 7038511406, तवाआश्रमशाळा,तवा, धनंजय जाधव, उप अभियंता सा.बां.उपविभाग डहाणू 9422955380, मुलांचे वस्तीगृह,जव्हार, सचिन खंबाईत, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग मोखाडा 9270279090, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोखाडा, डी.एस. बाविस्कर, उप अभियंता सा.बां.उपविभाग मोखाडा 8691912299, रेवेरा हॉस्टेल, विक्रमगड, . एच.टी. पवार, उप अभियंता सा.बां.उपविभाग विक्रमगड 9168075558, नंडोरे आश्रमशाळा, पालघर सं.अ. बदादे, उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग, पालघर 9975914218, पाली आश्रमशाळा, वाडा श्री. संतोष शिरसीकर, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग वाडा 9975573193, औद्यागिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, डी.डी. पाटील, उप-अभियंता सा.बां.उपविभाग जव्हार 8080909995, साखरे आश्रमशाळा, विक्रमगड श्री. दशरथ मुरुडकर, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग वाडा 9867775721, जिवन विकास विद्यालय, पालघर हितेंद्र निकुंभ, सहा.अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग पालघर 7385965448, भारती विद्यापीठ, जव्हार . रविंद्र चौधरी, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग जव्हार 7588628724, तहसिलदार कार्यालय, मोखाडा, विजय काळे, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग मोखाडा 9637342423, पॉलिटेकनिक कॉलेज, विक्रमगड . के.जी. संखे, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग वाडा 9987303838, मुक-बधिर विद्यालय, जव्हार, मुकुंद डाबेराव, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग जव्हार 8975345442, संतोषी आश्रमशाळा, डहाणू श्रीम. जयश्री निरगुडे, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग डहाणू 9420610772, मुलींचे वस्तीगृह, जव्हार, . सुरेश वाघमारे, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग जव्हार 9422670147, सजन रिसॉर्ट, विक्रमगड, अंकुश निमजे, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग वाडा 9136787947, आयडिअल हॉस्पिटल, वाडा . उमर यु. शेख, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग वाडा 9930602492, साईबाबा हौ.कॉ.,पानेरी,माहिम, पालघर, विश्वंबर वाळके, शाखा अभियंता जि.प. ग्रा.पा.पु. उपविभाग, पालघर 8097361833, मुलांचे वस्तीगृह, पालघर . प्र.का. मयेकर, उपविभागीय अभियंता पाटबंधारे बांधकाम उपविभाग, पालघर 9920683920, सेंट जोसेफ कॉलेज सतपाळा वसई, . प्रशांत ठाकरे, उप अभियंता सा.बां.उपविभाग वसई 7875380854, एकलव्य आश्रम स्कुल पालघर . अ.वि. पाटील, उपविभागीय अभियंता पालघर पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग मनोर 9867179609,

जिल्ह्यातील डेडिकेटेड हेल्थ कोव्हिड सेंटर DCHC (Dedicated Covid Health Centre)
ट्रॉमा केअर सेंटर, डहाणू श्री. रविंद्र अभंगराव, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग डहाणू 9860970015, वेदांत इन्स्टीट्यूड ऑफ मेडिकल सायन्स, बिल्डींग 2, डहाणू श.गो. गायकवाड, सहा.अभियंता पाटबंधारे उपविभाग, मनोर 9730865868, रूरल हॉस्पिटल पालघर, महेंद्र किणी, उ प अभियंता सा.बां.विभाग पालघर 9422479476, दयानंद हॉस्पिटल, तलासरी, शरद वाकोडे, शाखा अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग तलासरी 8329355195, आयडिअल हॉस्पिटल, वाडा, . ध.पाटील, उपविभागीय अभियंता उपविभाग धोंडावडवली, ता.वाडा 9892980738, टिमा हॉस्पिटल, बोईसर . के.एम. इल्हे, शाखा अभियंता जि.प. जलसंधारण उप विभाग,पालघर 9892228598,
जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल DCH (Dedicated Covid Hospital)
वेदांत इन्स्टीट्यूड ऑफ मेडिकल सायन्स, धुंदलवाडी, डहाणू . स.भ. जाधव, उपविभागीय अभियंता पालघर पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग मनोर 9405003311, रेवेरा हॉस्पिटल, विक्रमगड .संतोष शिरसीकर, शाखा अभियंता जि.प. ग्रा.पा.पु. उपविभाग, पालघर 9975573193, ढवळे हॉस्पिटल, पालघर श्री. कचरे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपविभाग पालघर 9892980738
सदरचा आदेश हा पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!