जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल प्रथम

वसई (प्रतिनिधी) : शिक्षण विभाग पालघर यांचे ४५ वा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ३ व ४ जानेवारी २०२० रोजी लालबहादूर शास्त्री विद्यालय (मनोर, जिल्हा पालघर) येथे भरले होते. या प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल (वसई)  या शाळेच्या स्व-स्वरक्षक‘ हा प्रकल्प मांडला होता.या प्रकल्पाला पालघर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त होऊन राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

या प्रकल्पाचे मार्गदर्शन शिक्षक गणेश कान्हा भोईर हे होते व हा प्रकल्प शाळेच्या विद्यार्थ्यांनी, कु.मनस्वी महेश सवे (९वी), कु.तेजस्विनी प्रवीण हटकर यांनी तयार केला होता. या प्रकल्पाच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य माणिक दोतोंडे, बरवे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बबनशेठ नाईक व सचिव सुरेश वायंगणकर, उपमुख्याध्यापिका सौ.एस.एल वाझ तसेच पर्यवेक्षिका सौ.तमखाने मॅडम, पर्यवेक्षक पि.के जाधव, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच समाजातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या सहभागी साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: