जिल्ह्यातील समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार – ऍड.यशोमती ठाकुर

पालघर (वार्ताहर) : नवनिर्मित पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणा चा प्रश्न सोडवायचा असून या पार्श्वभूमीवर पालघर मध्ये विविध योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासकीय सुविधा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविन्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असून या सर्व बाबीचा तसेच करण्यात येणाऱ्या उपाययोजनाचा आढावा घेण्यात आला असून जिल्ह्यातील समस्या या प्राधान्याने सोडविल्या जाणार असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी केले.

महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांचा पालघर जिल्हा दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे महिला व बालविकास विभागाचा आढावा तसेच कोरोना संदर्भात करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर बोलत होत्या.
यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण, घरगुती हिंसाचार, मुले पळवण्याचे, पळून जाण्याचे प्रमाण, बालविवाह, कुमारिका अल्पवयीन माता,संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक,मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध सुविधा यावर आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात महिला व बालविकास सोबत काम करणाऱ्या एनजीओ, त्यांचे उपक्रम यावर विस्तृत आढावा घेतला.
महिला व बालविकास विभागाच्या सचिव, श्रीमती आय.ए. कुंदन, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या आयुक्त इंद्रा मालो, महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपआयुक्त राहुल मोरे यांनी जिल्ह्यात महिला व बालविकास सोबत काम करणाऱ्या एनजीओ, त्यांचे उपक्रम यावर विस्तृत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी कोव्हीड-19 सद्यस्थिति बाबत व जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजना या बाबत सविस्तर माहिती मंत्री श्रीमती ठाकूर यांना दिली.
यावेळी खा.राजेंद्र गावित, आ.श्रीनिवास वणगा, जि. प.अध्यक्ष भारती कामडी, उपाध्यक्ष निलेश सांबरे, महिला व बालविकास सभापती अनुश्री ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव, श्रीमती आय.ए. कुंदन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभूवन, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या आयुक्त इंद्रा मालो,
महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपआयुक्त राहुल मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे, महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: