जेष्ठ पत्रकाराला वाहतुक पोलीसांची धक्काबुक्की

वसई (प्रतिनिधी) : पालघरमधील जेष्ठ पत्रकार पी.एम.पाटील यांची कॉलर पकडून वाहतुक पोलीसांने धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.या घटनेचा पालघर मधील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला असून त्या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाहतुक कोंडी झाली असताना आपण बघ्याची भुमीका का घेता असा सवाल पालघरमधील जेष्ठ पत्रकार पी.एम.पाटील यांनी केला असता,वाहतुक पोलीस वसावे याने त्यांची कॉलर पकडून  धक्काबुक्की केली.त्यानंतर वसावे याने पाटील यांना चौकीतही नेले.या घटनेची माहिती मिळाल्यावर पालघरमधील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला.त्यानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने दुपारी 12 वाजता अप्पर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांची भेट घेवून कारवाईची मागणी केली.चव्हाण यांनीही या प्रकराची गंभीर दखल घेवून वसावे याची पोलीस नियंत्रण कक्षात तात्काळ बदली केली.आणि वसावे याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!