“ज्ञान” ही भारताची खरी ओळख आहे त्यापासून कोणी वंचित राहू नये ! – धर्मसभा सचिव पं.हृषीकेश वैद्य

वसई : पालघर जिल्ह्यात बहुसंख्य गरीब-वनवासी व दर्यावर्दी भागातील विद्यार्थीवर्ग पुस्तकांसोबत इतर शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहे. या शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धर्मसभेने २०० विद्यार्थ्यांना सालाबादा प्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. शालेय शिक्षणाबरोबरच प्रत्येकाने आपापल्या परंपरागत कला – उद्योग – व्यवसायांचेज्ञान अर्जित करणे ही देखील काळाची गरज आहे व त्यासाठी समाजसेवी संस्था व सरकारने पुढाकार घ्यावा असे मत धर्मसभा सदस्यांनी व्यक्त केले.

‘परकीय आक्रमणांच्या आधी भारतात सर्वजातीय नागरिक उच्चविद्या विभूषित होते. तक्षशीला – नालंदा सारखी विश्वविद्यालये भारतात होती. शिक्षा, रक्षा, अर्थ, सेवा व न्याय क्षेत्रात भारताची बरोबरी करणे कोणालाही शक्य नव्हते. परंतू फेतांध व जुलमी परकीय सत्तांनी गेली १२०० वर्ष कुनिती, कुटीलता व अत्याचार करून ज्ञान विज्ञाना सहित सर्वकला-गुण संपन्न असलेल्या भारताला उध्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व त्यात सर्वजातीय भारतीय भरडले गेले. अनेक धर्मगुरू, विद्वान, शूरवीर, क्रांतीकारी व देशभक्तांनी आपले आयुष्य पणाला लावून परत भारताला स्वतंत्र केले. स्वातंत्र्योत्तर काळातही आरक्षणादिच्या विचित्र भेदभावामुळे शिक्षण व्यवस्था व त्यामुळे पुढील सर्व व्यवस्था ढासळत चालली आहे. आता भारताला ज्ञान-विज्ञाना सहित सर्व क्षेत्रात पूर्वीप्रमाणे शिखरावर नेउन ठेवणे ही आपली जबाबदारी आहे’ असा उपदेश धर्मसभा सचिव पं. हृषीकेश वैद्य यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: