ज्युनियर राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला उपविजेते तर मुलांच्या संघाला तृतीय स्थान

चंडीगड (प्रतिनिधी) : २९ नोव्हेम्बर – अमॅच्यूअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व चंदीगड लगोरी संघटनेच्या वतीने लगोरीचे जनक क्रीडारत्न, क्रीडामहर्षी स्व.संतोष गुरव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सहावी ज्युनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच चंदीगड येथे पार पडली. या स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संघानी सांघिक द्वितीय क्रमांक पटकावले तर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे उदघाटन आशियाई व भारतीय ग्लोबल व्हीक्स या संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुमेन तिवारी यांच्या हस्ते स्व. संतोष गुरव यांच्या प्रतिमेला हार घालून व लगोरी फोडून करण्यात आले यावेळी भारतीय लगोरी संघटनेचे अध्यक्ष संदीप गुरव,चंदीगड लगोरी संघटनेचे सचिव सुरेंद्र सिंघ,तांत्रिक मार्गदर्शक तुषार जाधव,भरत गुरव,संघटनेच्या अॅड.प्रिया संतोष गुरव, तसेच उपस्थित मान्यवर मनोज कुमार,चिंतामणी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा चालू होण्यापूर्वी सहभागी राज्यातील संघांनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली व स्व. संतोष गुरव यांना श्रद्धांजली वाहून खेळाडूंनी सामूहिक शपथ घेतली व स्पर्धेची सुरवात मोठ्या दिमाखात पार पडली यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अनेक नुत्य सादर करण्यात आली विशेषतः भांगडा डान्स ने सर्वाना खूप आवडले

उदघाटनाप्रसंगी डॉ. सुमेन यांनी लहानपणीच्या लगोरी खेळासंबंधीच्या आठवणी सांगितल्या व या खेळाचा चंदीगड मध्ये प्रसार होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. लगोरी खेळाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रातील लगोरीचा संस्थापक क्रीडा रत्न स्व. संतोष गुरव यांनी तन, मन, धन अर्पून प्रसार केल्यामुळे भारतातील सर्व राज्यांसह जगभरातील तीस देशांमध्ये आज तो खेळला जात आहे, याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. संतोष गुरव, गतवर्षी अचानकपणे आपल्यातून निघून गेले आहेत लगोरी खेळ संपूर्ण भारतातील सर्व राज्यां मध्ये जास्तीत जास्त लोकप्रिय होवून हा खेल ऑलम्पिक पर्यंत नेण्याचे तसेच त्यांनी लगोरीला उच्च स्थान देण्यासाठी पाहिलेले त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व प्रथम राहिलेला लगोरीचा वर्ल्ड कप लवकरच घेण्यात येणार असून त्यासाठी सर्व राज्यांनी सहकार्य करावे असे भावनिक आवाहन अध्यक्ष संदीप गुरव यांनी यावेळी केले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात दिल्ली (प्रथम), दादरा नगर हवेली (द्वितीय) आणि गोवा – महाराष्ट्र संघांनी तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात गोवा (प्रथम), महाराष्ट्र (द्वितीय) तर दिल्ली आणि पोंडेचरी संघांना तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून राजेंद्र पाटील,तन्वेश वेंकटेश्वर,संतोष नाईक,रमेश हजारे, संजय, स्वप्नील, तुषार यांनी विशेष परिश्रम घेतले.महाराष्ट्राच्या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दुहेरी यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र लगोरी संघटनेचे अध्यक्ष अनिकेत तटकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!