ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना “जीवन गौरव” पुरस्कार प्रदान

अंबरनाथ दि. २२ (वार्ताहर) : अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव २०१८” चा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना यंदाचा “जीवन गौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार जरी दिला असला तरी मी म्हातारी झाली नाहीये, मरेपर्यंत काम करणार आहे. तसेच हा पहिला जीवन गौरव पुरस्कार आहे त्या बदल त्यांनी आयोजक आणि परीक्षकांचे मनापासून आभार मानले. “संबळ” हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर “वन्समोअर” या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट हा पुरस्कार पटकाविला सोबत १३ इतर पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाले. “लाल बत्ती” हा चित्रपट सामाजिक चित्रपट ठरला आणि “फर्जंद” हा परीक्षक पुरस्कार चित्रपट ठरला.
अंबरनाथ येथील गावदेवी मैदानावर आयोजित या महोत्सवाला मराठी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी, वर्षा उसगावकर, विशाखा सुभेदार, समीर धर्माधिकारी, संगीतकार अशोक पत्की, नृत्यांगना मेघा घाडगे,बिग बाँस विजेती मेघा धाडे, आदी कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली.
आमदार डॉ. बालाजी किणीकर, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, नगरसेवक निखील वाळेकर या महोत्सवाला उपस्थित होते.
चौथ्या वर्षी साजरा करण्यात आलेल्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाला अंबरनाथकर रसिक नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी नृत्यकार रमेश कोळी आणि सहकलाकारांनी आपली कला सादर केली. अंबर भरारीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सर्वांचे स्वागत केले. अमेय रानडे व प्रज्ञा केळकर यांनी सूत्रसंचालन केले.
“संबळ” हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर “वन्समोअर” या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट हा पुरस्कार पटकाविला सोबत १३ इतर पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाले. लाल बत्ती हा चित्रपट सामाजिक चित्रपट ठरला आणि फर्जंद परीक्षक पुरस्कार चित्रपट ठरला, सुहास पळशीकर, अनंत जोग, रोहिणी हट्टगडी , सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, क्रांती रेडकर, मुकेश रिशी, समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये , यांना पुरस्कार प्राप्त झाले. सिने पत्रकार पुरस्कार कल्पना राणे यांना दिला गेला तर विशेष सन्मान पुरस्कार बिग बॉस विजेती मेघा धाडे यांना दिला गेला.
वर्षा उसगावकर, विजय पाटकर , सतीश रणदिवे , पितांबर काळे, यांनी महोत्सवा बद्दल गौरवउद्गार काढले आणि अंबरनाथ सारख्या ठिकाणी इतक्यामोठ्या प्रमाणात असा सोहळा सलग ४ वर्ष होतो आहे आणि तो याही पुढे होत राहावा अशी इच्छा विजय पाटकर यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. यंदाचे संगीतकार म्हणून विजेते अशोक पत्की यांनी सुद्धा महोत्सवाच्या आयोजनासाठी अंबर भरारी आणि चित्रपट महामंडळाचे आभार मानले.
अंबर भरारी संस्थेचे प्रमुख सुनील चौधरी त्यांचे सहकारी गुणवंत खिरोदिया, दत्त्ता घावट, निखील चौधरी, अमित गरगटे, अभय शिंदे, अनिल कवठेकर, डॉ. राहुल चौधरी यांनी या महोत्सवाच्या आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली , अंबरनाथकर लेखक दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी या चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. दर वर्षी या महोत्सवाची लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असू असे सुनील चौधरी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!