ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ गिरीश वासुदेव यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ गिरीश वासुदेव यांचे काल ३ फेब्रुवारी २०१९ रोजी निधन झाले.  निधनसमयी ते ८२ वर्षांचे होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी इंजिनीअर्स ऑफ इकॉनॉमिक्स ही पदवी संपादन केली होती. बँक ऑफ बरोडा तसेच बॉब कार्डचे ते संचालक होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते सल्लागार होते. सरकारच्या आर्थिक धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत त्यांचा सल्लागार म्हणून वाटा होता. अर्थ विषयक अनेक वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती तसेच अनेक संस्थांमधून त्यांनी व्याख्याने देत असतं. त्यांना स्वतहाविषयी प्रचंड आत्मविश्वास होता. काही वर्षांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. परंतु जगण्याच्या प्रचंड इच्छाशक्ती च्या जोरावर ते त्या दुर्धर आजारातून बरे झाले व त्यांनी आपले काम पूर्ववत सुरू ठेवले.
मराठी भाषेविषयी त्यांना फार अभिमान होता. अनेक मराठी प्रकाशकांना त्यांनी जाहिराती द्वारे आर्थिक पाठबळ दिले होते. दिवाळी अंकांच्या प्रकशाकाबद्दल त्यांना विशेष आस्था होती. जेवढी म्हणून शक्य होईल तेवढी मदत ते दिवाळी अंकांना करीत असत. अर्थात सर्वांना मदत करणे शक्य होत नसे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही लोकांमध्ये थोडीशी नाराजीही असे.
त्यांचे कार्यालय व घर एकच असल्याने त्यांच्याकडे माणसांचा सतत राबता असे. दिवाळी अंक, मराठी पुस्तके ते अनेक भेट देत असत. मराठी भाषेला विशेष दर्जा मिळावा असे त्यांच्या बोलण्यातून सतत व्यक्त होत असे. सांस्कृतिक क्षेत्रात ही त्यांनी अनेकांना सहकार्य केले होते.
त्यांच्या पश्चात मुलगा गौतम, सूनबाई पूजा, नातू यशराज व विवाहित कन्या विद्या जव्हेरी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!