ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना ‘मूकनायक’ पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यिकांचे अभ्यासक व  ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना राज्य शासनाचा ‘मूकनायक’ या सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने  गौरव करण्यात आले. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, टीव्ही पत्रकार गोविंद तुपे आणि महिला पत्रकार योगिता साळवी यांचाही या  पुरस्कारप्राप्त पत्रकारांमध्ये समावेश आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी ‘मूकनायक’ नावाचे पाक्षिक काढले होते. यानिमित्त महाताष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या  यंदापासून हा पुरस्कार सुरू केला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह  असे आहे.
 दिल्लीत योजिलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी ‘मुकनायक’ पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना सामाजिक न्याय रुजविण्यासाठी ‘मूकनायक’ हा पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने सुरू केला आहे. ते म्हणाले,       डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्यायाचे  प्रतीक आहेत. त्यांनी केलेले सामाजिक, धार्मिक, आंदोलने, हे सदैव भारतीय समाजाला प्रेरणादायी राहतील. डॉ. आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिकाची सुरवात करून इतिहास घडविला आहे. जगातील प्रतिष्ठित विद्यापीठात उच्चशिक्षण घेऊन त्यांनी स्वतः चे संपूर्ण जीवन हे सामाजिक न्यायासाठी व्यतीत केले. त्यामुळे या पुरस्काराचे विशेष महत्व आहे, असे श्री. बडोले म्हणाले.
याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, गृह राज्यमंत्री हंसराज अहिर सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आदी मान्यवरांची भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!