झेरॉक्सच्या दुकानात मिळतो पंधराशे रुपयात ई-पास

वसई (वार्ताहर) : सर्वसामान् य लोकांना उपलब्ध न होणारे ई-पास झेरॉक्सच्या दुकानातून पंधराशे रुपयांत मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपारात उघडकिस आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आपल्या गावी जाता यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर मार्ङ्खत ई-पास ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे सोलापुर, कोल्हापुर, सांगली, सातारा, रत्नागिरी ला जाण्यासाठी ऑनलाईन पासेस काढण्याचा प्रयत्न शेकडो नागरिकांनी केला. मात्र, त्यांना अप्रुवल मिळाले नाही. यु आर वेंटीग असा मेसेज त्यांना सतत  येत होता. दुसरीकडे मात्र, झेरॉक्सच्या दुकानदारांना ई-पास सहज उपलब्ध होत होते. हे पास नागरिकांना काळाबाजाराने विकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे.

बहुजन विकास आघाडीचे नालासोपारातील कार्यकर्ते महेंद्र कदम यांनाच ई-पाससाठी पंधराशे रुपये मोजावे लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. कदम यांच्या आजारी वडीलांना तातडीने गावी जायचे होते. त्यासाठी त्यांना ई-पास काढण्याचा ऑनलाईन प्रयत्न वारंवार केला.मात्र, त्यांच्या पासला अप्रवुल न येता वेटिंग असा मेसेज येत राहिला. वडीलांचे गावे जाणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे कदम यांनी एका मित्राची मदत घेतली. त्यावेळी झेरॉक्सच्या दुकानात जा लगेच काम होईल असा सल्ला त्या मित्राने दिला. त्यामुळे कदन यांनी जवळील झेरॉक्सच्या दुकानात धाव घेतली असता, आजुबाजुला असलेल्या दोन दुकानांनी ई-पाससाठी त्यांच्याकडून पंधराशे रुपये उकळले. या पंधराशे रुपयांतील प्रत्येक ई-पासचे तेराशे रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावे लागतात, असे सदर दुकानदारांकडून सांगण्यात आले.

त्यामुळे या ई-पास लुटीची घटना कदम यांनी अन्यायाला वाचा फोडली. या घटनेची गंभीर दखल घेवून शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-पास प्रमुख तहसिलदार उज्वला भगत यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर महेंद्र कदम यांनी गणेश आणि रामदेव या दोन्ही झेरॉक्सच्या दुकानांची नावे कळवून जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: