ट्रान्सफॉर्मर आग प्रकरण ; दुकाने व वाहनांची नुकसान भरपाई देण्याची मागणी

वसई, दि.१४ (वार्ताहर) : वसईरोड (प) येथील अंबाडी रोडवर  असलेल्या ट्रान्सफॉर्मरला बुधवारी लागलेली आग ही विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नमुना असून, ट्रान्सफॉर्मरची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती न होणे, तसेच त्यावर अतिरिक्त विदयुत भार टाकल्या जाणे यामुळेच ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन ही दुर्घटना झाल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या आगीची जबाबदारी स्वीकारून विद्युत वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता पुढे आली आहे. 
बुधवारी  सकाळी डॉ.कणेकर हॉस्पिटल समोर रस्त्यालगत असलेल्या या ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. ही आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच ट्रान्सफॉर्मरच्या शेजारील उभी असलेली वाहने व दुकाने जळून खाक झाली. अग्नीशमन दलाला याबाबत माहिती मिळताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी  आगीत ३ कार व २ दुचाकी गाड्या मिळून पाच वाहने आणि ३ दुकाने (टपऱ्या) जळून खाक झाल्‍या आहेत.
टनेनंतर तेथे लगेच पोहचलेल्या स्त्री-सखी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. मनीषा कणेकर यांनी सांगितले
की, ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊनच ही आग लागली असून, याचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. विद्युत वितरण कंपनीने आपल्या ट्रान्सफॉर्मरची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असून, कंपनीच्या बेजबाबदारपणामुळेच ही दुर्घटना ओढवली,असा आरोपही त्यांनी केला.  या आगीत जळालेल्या गरिबांच्या वाहनांची व दुकानांची नुकसान भरपाई विद्युत वितरण कंपनीने द्यायला हवी, अशी मागणी सौ कणेकर यांनी केली असून, अग्निशमन दल आणि पोलिसांचा रिपोर्ट आल्यावर आपण 
विद्युत वितरण कंपनीकडे नुकसान भरपाईचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
One comment to “ट्रान्सफॉर्मर आग प्रकरण ; दुकाने व वाहनांची नुकसान भरपाई देण्याची मागणी”
  1. Vahan wale garib kadhi paun dukan walya na thik aahi pan vahan malkana ka te road var parking ka kartat v tyana insurance cha pisa menar aahai

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!