ठेकेदारास मोकाट सोडण्याचा हा प्रकार ; कामगार नेते एड.किशोर सामंत, श्रमजीवी कामगार संघटनेचा आरोप

भाईंदर दि .४ ( वार्ताहर) :  मीरारोडच्या जे.पी.इन्फ्रा या बडय़ा विकासकाच्या इमारत बांधकाम स्थळी काम करताना ७ व्या मजल्या वरुन पडुन मरण पावलेल्या एका अकुशल कामगाराच्या मृत्यु प्रकरणी काशिमीरा पोलीसांनी तब्बल महिन्याभराने गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे १० वी शिकलेल्या मजुर कर्मचारायास सेफ्टी सुपरवायझर म्हणुन या मृत्युस जबाबदार धरुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डर व ठेकेदारास वाचवण्यासाठी हा खटाटोप केला गेल्याचा आरोप होत आहे.

मीरारोडच्या विनय नगर जवळ जे.पी. इन्फ्रा या बडय़ा बिल्डरचा इमारत बांधकाम प्रकल्प सुरु आहे. एलोरा नावाने २२ मजली इमारतीचे बांधकाम असुन २७ जानेवारी रोजी सदर बांधकाम साईड वर काम करणारा संदिप झंटु माल (२२) मूळ रा. पश्चिम बंगाल हा अकुशल कामगार ७ व्या मजल्या वरुन पडुन मरण पावला होता. संदिप हा जे.पी. नॉर्थच्या हाटकेश येथील मजुरांच्या कॅम्प मध्ये रहात होता.  या प्रकरणी काशिमीरा पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद करुन तपास सुरु केला होता. या प्रकरणी फेब्रुवारी मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सदर ठिकाणी २२ मजल्याच्या इमारतीचे दोन  विंगचे बांधकाम करण्याचे कंत्रट करम इंटरप्रायङोस ला जे.पी. इन्फ्राने दिलेले आहे. २२ मजल्यांचे काम झालेले असुन बी विंगच्या 7 व्या मजल्या वरील लिफ्ट साठीच्या डक्ट मध्ये सुरक्षा जाळीवर पडलेले सिमेंट – काँक्रिट काढण्याचे काम अकुशल कामगार असणारा संदिप करत होता. एका हाताने दोरीला धरुन त्याचे काम चालले असताना सुरक्षा जाळी फाटुन जाळीसह तो खाली पडला व मरण पावला. त्यावेळी करम इंटरप्रायङोस या ठेकेदाराच्या वतीने सुरक्षा सुपरवायझर म्हणुन सुखेन फटीक माल (२८) हा असल्याने त्याच्यावर संदिपच्या मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंतु संदिप हा अकुशल कामगार असताना देखील त्याच्या सुरक्षितते बाबत खबरदारी घेण्यात आली नाही. बांधकाम ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या नाहित. तसेच त्याची नियमीत तपासणी व काळजी घेतली गेली नाही. तर आरोपी केलेला सुरक्षा सुपरवायझर सुखेन हा केवळ १० वी शिकलेला असुन तो सुध्दा मजुरकाम करणारा आहे. सुखेन देखील संदिप रहात असलेल्या जे.पी. नॉर्थच्या लेबर कॅम्प मध्ये राहणारा आहे. 1क् वी शिकलेल्या मजुराला चक्क सुरक्षा सुपरवायझर ठरवुन आरोपी केले आणि बिल्डर व ठेकेदारास मोकाट सोडण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप कामगार नेते किशोर सामंत, श्रमजीवी कामगार संघटनेने कार्याध्यक्ष सुलतान पटेल आदींनी केला आहे. या आधी देखील अशा घटनां प्रकरणी विकासक, ठेकेदारावर गुन्हे दाखल झालेले आहेत अशी माहिती पटेल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!