डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीमध्ये

विरार : भारतीय संविधान दिनाच्या सन्मानार्थ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून देशाची राजधानी नवी दिल्ली येथे, आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन, नॕशनल युथ अवाॕर्ड फेडरेशन आॕफ इंडिया नवी दिल्ली आणि वल्ड सेव्हन वल्डर्स पब्लिकेशन यांच्या सयुक्त विद्यमाने सोमवार दि. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी अखिल भारतीय सामाजिक न्याय  संमेलन तथा राष्ट्रीय सन्मान  समारोह -२०१८ चे आध्रभवन येथे आयोजन करण्यात आले होते.
विरार येथिल ज्येष्ठ कवी, लेखक डॉ.अ.ना. रसनकुटे, अध्यक्ष – पालघर जिल्हा (अ.भा.म.सा.प) यांच्या “उदास चांदणं ” या कथा संग्रहाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन मा. रामदासजी आठवले, सामाजिक न्याय, राज्य मंत्री, केंद्र शासन यांच्या  शुभहस्ते पार पडले. या पुस्तकाची सुबक छपाई, महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यानी केली आहे. त्याचप्रमाणे डॉ.रसनकुटे यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन मा. रामदासजी आठवले यांच्या हस्ते “भारत साहित्यरत्न राष्ट्रीय पुरस्कार” हा मानाचा पुरस्कार मा. रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते देऊन सन्मान करण्यात आला. ते पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष (अ.भा.म.सा.प) असल्याने त्यांंनी पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात, शहरात परिषदेच्या शाखा निर्माण करून त्याव्दारे मराठीचा प्रचार, प्रसार व संवर्धन करण्याचं कार्य आपल्या सहकाऱ्यांना घेऊन करीत असतात. त्यांनी सोळा पुस्तकांचं लिखाण केलं आहे. त्यांनी “अनार काव्य साधनी” ची पंचविस वर्षापूर्वी निर्मिती करून महाराष्ट्रात शंभराहून आधिक काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. त्यामुळे अनेक प्रशस्ती पत्रे देऊन त्यांचे सत्कारही ठिकठिकाणी झाले आहेत.
नाशिकमध्ये एकाच दिवसात पांच कार्यक्रम करून त्यांनी एक
वेगळा विक्रम केला आहे. “एकच ध्यास, कथा-कवितांचा प्रवास” ही काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन साहित्यिक संस्था स्थापना करून त्याव्दारे महाराष्ट्र, गोवा, दुबई, इंडोनेशिया आदि ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक कविसंमेलने यशस्वी पार पडली. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग,पुणे, बार्टी व आदिवासी समाज कल्याण विभाग,पालघर जिल्हा यांच्या वतीने त्यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना  व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, मार्गदर्शनपर व्याख्यान देण्यासाठी निवड झाली. त्यामुळे पालघर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  अनेक कॉलेज विद्यार्थ्यांना व्याख्याने दिल्यामुळे अनेक प्राचार्यानी व समाज कल्याण विभागातर्फे मानधन व प्रशस्ती पत्रे लाभली. ते अनेक साहित्यिक व सामाजिक संस्थेशी निगडित असून महत्वांच्या पदांवर कार्यरत आहेत. वल्ड ह्युमन राईट्स पीपल कौन्सीलचे ते राष्ट्रीय  सचिव म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय, तीन राष्ट्रीय, दोन महाराष्ट्र शासन व इतर राज्यस्तरीय पुरस्कार  अशा ३४ पुरस्कारानी त्याना सन्मानित करण्यात आले आहे. साहित्यिकांचे हात लिहिते राहावेत म्हणून अनेक कवी, लेखकांच्या पुस्तकांना प्रस्थावना देण्याचं त्यांना भाग्य लाभलं आहे.
अनेक साहित्यिकांंना त्यांंनी व्यासपीठ मिळवून दिलं आहे. डॉ. अरूण घायवट यांना राष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार, डॉ. नेहा संखे, यांंना राष्ट्रीय  शिक्षक पुरस्कार, उर्मिला घरत यांना, राष्ट्रीय साहित्य
दर्पण पुरस्कार, अनिता घायवट यांंना राष्ट्रीय महिला शक्ती पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले. रसनकुटे यांच्या अध्यक्षतेखाली तेथे बहारदार कविसंमेलन मोठ्या दिमाखात पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!