डोक्यात पट्टी मारल्यामुळे विद्यार्थींनी अत्यवस्थ

वसई (वार्ताहर) :  शिक्षिकेने पट्टी डोक्यात मारल्यामुळे चौथीतील विद्यार्थींनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून,अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

नालासोपारा पुर्वेकडील जे.डी.आयडीयल शाळेतील विद्यार्थींनी संध्या मिश्रा ही चौथीतील विद्यार्थींनी शुक्रवारी शेवटचा पेपर देवून सहविद्यार्थी असलेल्या मुलीबरोबर मस्ती करत होती.त्यामुळे इंग्रजीतील शिक्षिका रोझी यांनी त्यांना दटावले.तरिही त्यांनी ऐकले नसल्यामुळे रोझी यांनी तीच्या डोक्यावर फुटपट्टीचे फटके मारले.हा प्रकार संध्याने आपल्या पालकांना सांगतिला.त्यानंतर घरी आल्यावर संध्याच्या डोक्याला सुज आली.त्यामुळे उपचारासाठी तीला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले तीथे ती दोनदा बेसुध्द पडली.त्यामुळे तीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे तीचे वडील मिथीलेश मिश्रा यांनी सांगितले.

या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून,संध्याचा जबाब घेण्यात आला आहे.शाळेत नेमके काय घडले याचा तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरिक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!