ड्रंक ड्राइव्ह ऐवजी शांतता भंगचा गुन्हा दाखल

वसई (वार्ताहर) : शुक्रवार दिनांक १२ जून २०२० रोजी रात्री १२.४५ ते १.१५ वाजताच्या सुमारास वसई पोलीस ठाण्याच्या हद्दित सागरशेत पेट्रोल पंपा जवळ एका कारचा अपघात झाला. वसई-विरार मनपा मार्फ़त या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खोदकाम केलेले आहे.

यावेळी सदर कार सुसाट वेगात रवि जाधव चौक कडून पेट्रोल पंप दिशेने येऊन अपघातग्रस्त झाली. निनाद सुहास गोकर्ण हा चालक मद्याच्या नशेत बेधुद होऊन ही गाड़ी चालवत होता. अशी माहीती स्थानिकानी दिली.

घटने नंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस नाईक गायकवाड़, पोलिस नाईक लोंढे,पोलिस शिपाई माने,एएसआय गुजर या चौघांचा यात समावेश होता. वास्तविक चालकाची मेडिकल टेस्ट करून त्यावर भारतीय दंड विधान ३३७, ३३८ (ड्रिंक एन्ड ड्राइव्ह) अन्वये गुन्हा दाखल करण्या ऐवजी भादवीस ११२, ११७ (शांतता भंग करणे) अन्वये गुन्हा दाखल करून धोकादायक अवस्थेत गाड़ी चालका कडून आर्थिक व्यवहार करून त्याला सोडून दिल्याच्या तपशील असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत केलेल्या संभाषणा वरुन या बाबी स्पष्ट होत आहेत.

 

ही बाब अतिशय गंभीर असून याबाबत काही नेटकऱ्यानी पोलिस अधीक्षक पालघर यांना जाब विचारत या घटनेची चौकशी करून चार ही दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अश्याच स्वरूपाच्या घटना घड़लेल्या आहेत. एखाद्या नागरिकांचा बळी गेल्यावरच दारुड्या चालकावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तो पर्यन्त आर्थिक मांडवली करून पोलिसच आरोपिला अश्या पद्धतीने फिरण्याचा परवाना देत आहेत.

या घटने नंतर शिवसेना नेते, मी वसईकर चे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी याची तात्काळ दखल घेत जिथे अपघात झाला तिथेच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक १५ जून रोजी सकाळी ११ वाजता पालिका अधिकारी यांच्या उपस्थितीतच तोंडाला मास्क लावून या खोदकामच्या विकास कामाचा तपशील सादर करण्यासह घटनेची माहीती घेण्यासाठी शिस्तबद्ध रीतीने हे आंदोलन असणार आहे, यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धती बाबतचा आढावा घेतला जाणार असल्याची माहीती प्राप्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!