तयारी कुरुक्षेत्राची ; पाकिस्तानला धडा शिकविण्याची आणि १७ व्या लोकसभेची ! – योगेश वसंत त्रिवेदी

गुरुवार १४ फेब्रुवारी २०१९ विदेशाने नाकारलेल्या संत व्हेलेंटाइनला अनुकरणप्रीय अशा आपल्या देशाने डोक्यावर घेऊन `व्हेलेंटाईन डे’ च्या नशेत तरुणाई झिंगत असतांना अचानक केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर जैश ए मोहंमद च्या आदिल अहमद दार उर्फ वकास या अतिरेक्याने गोळीबाराच्या फैरी झाडल्या. प्रचंड स्फोटके वापरुन हा हल्ला करण्यात आल्यामुळे भारतमातेचे 40 जवान शहीद झाले. तरुणाईची झिंग उतरली. अख्खा देश शोकसागरात बुडाला आणि तितक्याच त्वेषाने संतापाने फणफणत होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत प्रभु श्रीरामजन्मभूमी मंदिरावर अतिक्रमण करुन बाबराने उभारलेल्या मशिदीचा वादग्रस्त ढाचा जमीनदोस्त झाल्यानंतर पाकिस्तानातून आतंकवाद्यांच्या विविध संघटनांनी ना ‘पाक’ हरकती सुरु केल्या. १९९२ च्या आधी पाकिस्तानने ना पाक हरकती केल्या नाहीत असं नाही पण बाबरी उद्ध्वस्त झाल्याचं दुःख बाटगा जोराने बांग देतो अशा पध्दतीने ना पाक हरकती वाढवून दाखवत होते. भारतावर विविध बॉम्बस्फोट घडवून आणले. मग ते 12 मार्च 1993 चे बॉम्बस्फोट मालिकेचे असोत की मग विविध रेल्वे स्टेशनांवरचे असोत. उरीचा हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांचा परवाच्या गुरुवारी पुलवामाला पेंद्रिय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता.२६/११ चे दुःख अजुन आपण विसरत नाही तोच हा पुलवामाचा हल्लाल झाला. आता भारतातल्या तमाम १२५ कोटी देशवासियांनां कारगील, सर्जिकल स्ट्राईक पेक्षाही मोठ्या शस्त्रक्रियेची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आहे. पुलवामाच्या भ्याड हल्ल्यानंतर 42 बहाद्दरांचे पार्थिव पा… विमानतळावर आणण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि अन्य मान्यवरांनी या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. २०१३ च्या सुमारास केव्हातरी नरेंद्र मोदी यांनी ५६ इंच छातीचा उल्लेख केल्यानंतर लायकी नसलेल्या अनेकांनी वारंवार ५६ इंच छातीचा उल्लेख करुन आपली नसलेली पायरी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अर्थात अशा लायकी नसलेल्यांकडून `कुचेष्टा करणाऱयांची दखल न घेतलेली बरी. पंतप्रधानांनी अशा अदखलपात्रांची कधीच दखल घेतली नाही. `वाघ एकच राजा, बाकी खेळ…?’ अशा दिमाखात पंतप्रधान मोदी हे मार्गक्रमण करीत आहेत. पुलवामाच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराऔा संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. वेळ, स्थळ लष्काराने निश्चित करावे हे पंतप्रधानांनी सुस्पष्ट शब्दांत सांगून `हे व्यर्थ न हो बलिदान!’ असा संदेश दिला आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेव्हर्डचा दर्जाही भारताने काढून घेऊन ना पाक हरकत करणाऱया पाकिस्तानची नाकेबंदी करण्यास सुरुवातही केली. सरदार वल्लभभाई पटेलांनंतरचा खरा लोकपुरुष असलेले केंद्रिय सुसंस्कृत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तातडीने श्रीनगर गाठले. चर्चा केली आणि इतकेच नव्हे तर या लोहपुरुष, पोलादी पुरुषाने पुलवामाच्या हल्ल्यात धारातीर्थ पडलेल्या जवानांच्या पार्थिवाला खांदा ही दिला. यासाठी जिगर लागले जो राजनाथसिंह यांच्याकडे आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रक्षामंत्री निर्मला सीमद्य…… आणि रक्षा राज्यमंत्री डॉ. सुभाष भामडे आणि सुरक्षा सल्लागार अजित ………. हे कामाला ही लागले आहेत. आता १२५ कोटी देशवासियांना फक्त निकालाची प्रतिक्षा आहे. कधी एकदाचा पाकिस्तानचा निकाल लागतो हे पहायचे आहे आणि होणार १९६५ – १९७१ ची पुनरावृत्ती होणार याची मनोमन खात्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच ही कारवाई होणार याची खात्री आहे. पुन्हा डोकं काढून ना `पाक’ हरकती करण्यासाठी उभं राहणार नाही असं कंबरडं मोडावं लागणार आहे. 
यासाठी १२५ कोटी देशवासियांच्या मनोमन शुभेच्छा नरेंद्र भाई आणि त्यांच्या सरकारच्या पाठीशी आहे. नरेंद्र मोदी देशाचे संरक्षण करण्यात अपयशी ठरण्याचा ठपका तत्कालीन समितीनी आणि आता अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर बनायला निघालेल्या आणि 80 व्या वयातही गुडघ्याला बाशिंग बांधणाऱया जाणता राजजाने ठेवला आहे. या जाणता राजाने जरा आपल्या सभापती पदी असलेल्या कारकीर्दित पाकिस्तानला कितीवेळा धडा शिकविला याची असतील तर उदाहरणे देशवासियांसमोर मांडावीत. रक्षामंत्री असताना हे जाणते राजे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांच्या घणाघाती कारकीर्दिमुळे घायाळ झाले होते आणि राज्यमंत्री असलेल्या पुतण्याच्या शिवनेरीवरुन सुधाकरराव नाईक यांना घरी पाठवण्यासाठी ……… करीत होते हे महाराष्ट्राला माहित नाही असे वाटत असेल तर तो त्यांचा समज चुकीचा आहे. या जाणत्या राजाच्या काळातच बाबरी मशीद पडली आणि महाराष्ट्रात दंगली उफाळून आल्या म्हणून अपयशाचं (नसलेल्या) खापर फोडून मुख्यमंत्री पदाचा `ताज’ स्वतच्या शिरावर खेचून घेतला. १२ मार्च १९९३ ला १२ बॉम्ब स्फोट घडले असताना १३ वे ठिकाण मशीदीचं टाकून हिंदु वाद्यांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करणारे या महाराष्ट्राने पाहिले आहेत. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना विनम्र अभिवादन!
१६ व्या लोकसभेचा शेवटचा दिवस पार पडला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचा आपल्या १६ व्या लोकसभेतील शेवटच्या भाषणात यथायोग्य समाचार घेऊन पुन्हा पंतप्रधान पहायला आवडेल असं म्हणणाऱया मुलायमसिंह यादव यांना विशेष धन्यवाद दिले आणि मुलायमसिंह यादव यांनी आशिर्वाद दिले असल्याचे खास अधोरेखित करुन देश वासियांना विरोधकांनीही पावती दिल्याचे दाखवून दिले. अर्थात मुलायमसिंह पासून यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी पुन्हा बसावेत हे वक्तव्य केले ते अनेकांना रुचलेले नाही. राहुल गांधी यांनी तत्काळ विरोध केला. मुलायम सिंहाना तो होणारच होता पण राबडी देवीने मुलायमसिंह यादव यांच वय झालं असे म्हणावं या सारखा दुसरा विनोद नाही. लालुप्रसाद यादव तुरुंगात गेल्यामुळे अपघाताने (आणि जबरदस्तीने) मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलेल्या आणि कोणताही राजकीय अनुभव पाठीशी नसलेल्या (अर्थात असे अनेक जण आहेत) राबडी देवी यांनी मुलायमसिंहाची कुचेष्टा करावी यासारखे दुर्देव या भारताच्या राजकारणात …. असू शकतं. बिहारची राजगद्दी आपल्या बापजाद्यांची विरासदारी असल्यासारख्यांकडून दुसरी अपेक्षा ती काय ठेवावी? नितीश कुमार यांनी या अशा लोकांची नांगी ठेचली हेच महत्त्वाचे आहे.
१६ वी लोकसभा बरखास्त होऊन १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी होईल. भारत निर्वाचित आयोग कार्यक्रम जाहीर करील. अर्थात पाकिस्तान बाबत जे काही घडेल त्यावर अवलंबून आहे. जर युध्द किंवा तत्सम काही मोठी कारवाई झाली तर निवडणुका पुऐ ढकलल्या जातील अशी चर्चा आहे. जे होईल ते स्वीकारणे हेच आपल्या हाती आहे. पण एक जमाना होता की काँग्रेस विरोधात सर्व एकत्र येत होते. आता नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी बारामती पासून सर्व होताहेत. महागठबंधन बनवण्याचा घाट घातला जातोय. नरेंद्र मोदी यांनी महागठबंधनला `महामिलावट’ अशी संभावना करुन त्यांची औकात त्यांना दाखवून दिली आहे. नोटबंदीमुळे परेशान झालेले एक होत असल्याचे बोलले जात आहे. प्रियंका गांधी यांनाही मैदानात उतरविण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या महासचिव पदावर बसल्या काय लगेच इंदिरा गांधींची छायाचित्रे फिरु लागली. प्रियंका गांधी या पूर्वीही निवडणुकीच्या प्रचारासाठागांधी या सोनियांच्या काळात पुढे आल्या होत्या. त्यांच्या मदतीकरीता आता राहुल गांधी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर त्या महासचिव बनल्या. जर ……. यांना इतके महत्व असेल याचा अर्थ राहुल गांधी हे 17 व्या लोकसभेचे शिवधनुष्य पेलण्यास एकटे असमर्थ आहेत असाच अर्थ काढावा लागेल. मोदींना ओ……. कोणी म्हणजे सैनिक/जवानांना व……… वनपेन्शन म्हणता म्हणता `ओ….. रुल, ओ….. प्रियंका’ हा बुडत्या काँग्रेसलाकाडीचा आधार अशी खिल्ली उडवली आणि त्यांचे काम त्यांच्या म… घातले.
महाराष्ट्रात अॅड. प्रकाश आंबेडकर हे शंभर वर्षाच्या इतिहास सांगणाऱया पक्षांना आणि जाणत्या राजांनाही …… एका बाजूला असु….. ओबेसींचा हात धरलाच तर दुसऱया बाजुला अशोक चव्हाण, छगन भुजबळ, माणिकराव ठाकरे यांना आपल्या दारात यायला लावताहेत. काँग्रेस पक्षाला इमोशनल ब्लॅकमेल करीत असल्याची चर्चा आहे. पण महागठबंधनमध्ये प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे यांच्या सारख्यांना सामावून घेणे आणि प्रचारासाठी हार्दिक पटेल, जिम्नेश मेवाणी, अल्पेश ठाकूर, कन्हैयाकुमार यांना बोलावणे यासारखे जाणत्या राजाचे अपयश ते दुसरे काय असू शकते. नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी, अमित शाह यांच्या सारख्यांना नामोहरम करण्यासाठी महाआघाडी बनवून सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱयांना काय बोलणार ?  २०१४ रोजी शरद पवार हे राज्यसभेवर निवडून गेले. २०२० पर्यंत त्यांची मुदत आहे. पण विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेचे गाजर दाखवून माढामधून लोकसभेवर निवडून जाण्यासाठी या ऐशी वर्षाच्या जवानाने शड्डू ठोकले. पण विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभा कशी मिळणार? याचे गणित कसे सुटेल? कारण आता जर शरद पवार हे लोकसभेवर निवडून गेले आणि सहा महिन्यात राज्यसभेची पोटनिवडणूक लागली तर ती राज्यसभेची जागा भारतीय जनता पार्टीच्या ताफ्यात आणणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहज शक्य आहे. हे गणित असताना विजयसिंह मोहितांना राज्यसभेचे आणि रणजित सिंह मोहित्यांना विधानपरिषदेचे गाजर का द्यावे? अर्थात शरद पवाराचीं `राज’ निती त्यांना ठाऊक. मोहिते पाटील परिवाराला मात्र याचा फटका बसणार हे नक्की पाहू या. घोडामैदान जवळ आहे पण `सबका साथ सबका विकास’ हे सूत्र घेऊन चालणाऱया मोदी आणि भाजपा परिवार हेच भारताच्या १२५ कोटी नागरिकांना अच्छे दिन आणतील हे नक्की. कुरुक्षेत्राची तयारी सुरु झाली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची आणि १७ व्या लोकसभेची !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!