ताल्यक्यातील दुकानांना लावले आयुक्तांनी वार

वसई (वार्ताहर) : वसई तालु्यातील जवळपास सर्वच दुकाने सुरु करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले असून, सायंकाळी ७ वाजेपर्येत मुदत दिलेल्या या दुकानांना वार लावण्यात आले आहेत.

इले्ट्रॉनि्स, मोबाईल्स, क्लोथ  स्टोअर्स, ङ्खुटवेअर्स, बॅग, दागिने, कटलरी, स्टेशनरी, क्रॉकरी,खेळाचे साहित्य,गिफ्ट गॅलरी, घडयाळ, गादी, ङ्खर्नीचर, प्लास्टीक, शेती विषयक,पशुखाद्य,चष्मा,हार्डवेअर, वाहनांचे सर्विस सेंटर,ऍटोमोबाईल शॉप अशा दुकानांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देणारा आदेश महापालिकेचे आयुक्त गंगाधरन डी यांनी दिला आहे.मात्र,या दुकानांना वार लावण्यात आले आहेत.त्यानुसार सोमवार आणि गुरुवारी इले्ट्रॉनि्स, मोबाईल, स्टेशनरी दुकाने सुरु राहतील. मंगळवार आणि शुक्रवारी कपडे, ङ्खुटवेअर, कटलरी, ज्वेलरी, बुधवार आणि शनिवारी खेळणी, प्लायवुड,बेड, घडयाळ विक्री अशी दुकाने सुरु राहतील. रविवारी मात्र,सर्व दुकाने बंद राहतील. या आदेशातून अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने, मेडीकल स्टोअर्स, भाजीपाला आणि दुध विक्रीला वगळण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!