दिवंगत खेळाडू मनिष वर्तक स्मृति प्रित्यर्थ वसईत भव्य शुटींगबाॅल स्पर्धेचे आयोजन

वसई, प्रतिनिधि  : रंजन क्रिडा मंडळ देवाळे वसई आयोजीत दिवंगत खेळाडू मनिष वर्तक स्मृति प्रित्यर्थ भव्य शुटींगबाॅल स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक १७ फेब्रूवारी २०१९ रोजी करण्यात आले आहे.तसेच महिलांसाठी थ्रो-बाॅल स्पर्धाही १९ फेब्रूवारी रोजी भरविण्यात आलेल्या आहेत.   
    उत्कृष्ट शूटिंगबॉलपटू असलेल्या मनिषने तालुका व जिल्हापातळीवरील अनेक शूटिंगबॉल स्पर्धांत चांगली कामगिरी केली होती. १९९७ साली १९ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची ठाणे जिल्ह्यातून निवड झाली होती. वसई ते लेह-लडाख प्रवास तसेच समुद्रसपाटीहून ५६०२ मीटर (१८३८० फूट) हा जगातील सर्वांत उंच असलेल्या खारदूंगला पास या मार्गावर जाण्यासाठी आखलेल्या मोहिमेत त्याचा यशस्वी सहभाग होता. वसई अ‍ॅडव्हेंचर क्लब या गिरिभ्रमण संस्थेचा सभासद होता.वसईतील देवाळे या गावातील मनिषचा २०१७ साली अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ तो राहात असलेल्या देवाळे येथील रंजन क्रिडा मंडळ वसई मार्फत शुटींगबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत मुंबई, ठाणे व पालघर येथील निवडक १६ संघांना प्रवेश दिला जाणार आहे.विजेत्या संघाला रोख पारितोषीके व चषक दिला जाणार आहे.या शुटींगबाॅल स्पर्धा रविवार १७ फेब्रूवारी २०१९ ला सकाळी १० वाजता देवाळे येथे घेण्यात येणार आहेत.तसेच महिलांसाठी थ्रो-बाॅल स्पर्धा मंगळवार १९ फेब्रूवारी २०१९ ला सकाळी ९ वाजता घेतल्या जाणार असून त्यात १२ संघांचा समावेश असणार आहे.महिला थ्रो-बाॅल स्पर्धा विजेत्या संघाला रोख पारितोषीके व चषक दिला जाणार असल्याची माहिती रंजन क्रिडा मंडळाचे मनोजकुमार वर्तक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!