धरणे आंदोलनाची पालिकेकडून दखल

वसई (वार्ताहर) : वसईतील तहानलेल्या ६९ गावांसाठी जागतिक पर्यावरण दिनी करण्यात आलेल्या  आंदोलनाची दखल घेवून महापालिकेने एमजेपीला योजनेबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.पर्यावरण संवर्धन समितीने या आंदोलनाचे आयोजन केले होते.

वसई तालु्यातील ६९ गावांना पाणी देण्यासाठी १५ जानेवारी२००८ ला महाराष्ट्र शासनाने ८५ कोटी १६ लाख रुपये मंजुर केले होते. २००९ मध्ये या योजनेचे जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते उद्धाटनही झाले होते. मात्र, त्यानंतर गेल्या ११ वर्षात जलकुंभ उभारण्यापलिकडे कोणतीच हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे वसईच्या पुर्वपट्टीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या गावांसाठी पश्चिम पट्टयातील विहीरीतून उपसा केला जात असल्यामुळे तेथील विहीरी कोरडया पडत चालल्या आहेत.या विहीरीचे पाणी पिऊन ग्रामस्थ आजारी पडत चालले आहेत.

त्यामुळे शासनाला आणि सत्ताधाऱ्यांनी जागे करण्यासाठी ५जुनला निर्मळ येथील रिकाम्या जलकुंभासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.समितीचे समन्वयक समीर वर्तक याच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या आंदोलनात पथनाटयकार झुराण लोपीस, डॉ.लोपीस,मॅ्स रोझ, सशी सोनावणे,डॉ डाबरे,टो डाबरे,आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे,वंदना जाधव, प्रकाश जाधव यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी त्यात सहभागी झाले होते.

या आंदोलनाची दखल घेवून महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुचना केल्या आहेत. या योजनेची वस्तुस्थिती आंदोलकांना कळवावी.असे लेखी कळवून पुढील कार्यवाही करण्यास सांगितले आहे.त्यामुळे या आंदोलनाला यश मिळाल्याचे वर्तक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!