धर्मप्रेमी हिंदूंवर अन्याय झाल्यास हिंदू विधीज्ञ परिषद त्यांच्या साहाय्यासाठी ठामपणे उभी राहिल ! – अ‍ॅड. संजीव पुनाळेकर

नालासोपारा (प्रतिनिधी) : धर्मप्रेमी गोरक्षक वैभव राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्थानिक हिंदू बांधव मोठया प्रमाणात रस्त्यावर उतरले. अशा प्रकारचे संघटन वर्ष 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांच्या अटकेच्या निषेधार्थ दाखवले असते, तर वर्ष 2009 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असते. धर्मप्रेमी हिंदूंना अशा प्रकारे कोणत्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला,तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यांच्या साहाय्यासाठी हिंदू विधीज्ञ परिषद ठामपणे उभी राहिल, असे आश्वासन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव ऍड. संजीव पुनाळेकर यांनी दिले. नालसोपारा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या जवळील मैदानावर हिंदु गोवंश रक्षा समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या प्रवक्तया सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे उपस्थित होते.

या सभेला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, शिवसेना विधानसभा संघटक  जितेंद्र शिंदे, हिंदू युवा वाहिनीचे जिल्हाध्यक्ष बीकेश यादव, जिल्हा संयोजक  प्रदीप मिश्रा, शिवसेनेचे वसई तालुकाप्रमुख  प्रवीण म्हाप्रळकर, भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, भाजपचे  नालासोपारा शहराचे जनरल सेक्रेटरी मनोज बारोट, शिवसेनेचे माजी नगरसेवक  हर्षद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचा प्रारंभी पुरोहित  विजय जोशी यांनी शंखनाद केला. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पुरोहित सर्वश्री विजय जोशीगुरुजी, विठ्ठलगुरुजी अणि गोविंद भालेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद काळे यांनी केले. हिंदु गोवंश रक्षा समितीचे दीप्तेश पाटील हिंदु गोवंश रक्षा समितीच्या कार्याची माहिती दिली. या सभेला 1 सहस्रहून अधिक हिंदू बांधव उपस्थित होते. ‘फेसबूक लाईव्ह’ द्वारे करण्यात आलेल्या या सभेचे थेट प्रक्षेपणाचा लाभ 1 सहस्र 200 धर्मप्रेमींनी घेतला.

अधिवक्ता पुनाळेकर पुढे म्हणाले की, पुरोगामित्वाच्या नावाखाली मनुस्मृती जाळणारे, जातीव्यस्थेच्या विरोधात बोलणारेच आज जातीव्यवस्थेला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. जनतेला लुटून स्वत:ची घरे भरणाऱ्या राज्यकर्त्यांना कठोर शासन करण्याचे कायदे हिंदु राष्ट्रात निर्माण केले जातील. हिंदू कधीही पोलीस किंवा सैन्य यांवर आक्रमण करत नाहीत. आज देशाची परिस्थिती एवढी भयावह झाली आहे, की भविष्यात जनता क्रांतीसाठी रस्त्यावर उतरल्याविना रहाणार नाहीत. ही संधी साधून जिहादी आणि नक्षलवादी देशाची सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा गंभीर परिस्थितीत पोलीस आणि प्रशासन यांचे साहाय्य मिळाले नाही, तर हिंदूंना त्यांच्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी हातात शस्त्र घेणे अपरिहार्य होईल. यासाठी हिंदूंनी आतापासूनच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन आत्मबळ वाढवायला हवे. दंगलीमध्ये मारल्या जाणाऱ्या मुसलमान युवकांच्या कुटुंबियांना शासन10 लक्ष रुपयांची भरपाई देते आणि हिंदू कुटुंबीयांना 5 लाख रुपये देते. अटकेत असणाऱ्या हिंदू धर्मप्रेमींचा छळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा शासन गौरव करते. दारू बंदी, डान्सबार बंदी, समलैंगिक संबंध, शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश यांसारख्या प्रकरणांमध्ये खटले चालवण्यासाठी वेळ असणाऱ्या न्यायालयाला श्रीराम मंदिराचा खटला चालवण्यासाठी वेळ नाही. सच्चर समितीच्या प्रकरणी 8वर्षांपासून प्रलंबित असलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ नाही, हे दुर्दैर्व आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना गोहत्या होतातच कशा? – नरेंद्र सुर्वे (प्रवक्ता-हिंदु जनजागृती समिती)

गोरक्षक वैभव राऊत यांसह काही हिंदूंना अटक करण्यात आली,तेव्हा पुन्हा एकदा भगवा आतंकवाद, हिंदूआतंकवाद यांसारखे शब्द प्रसिध्दीमाध्यमांतून बोलले जाऊ लागले. वर्ष 1993 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, 26/11 चे मुंबईवरील आक्रमण यांमागे कोणत्या रंगाचा आतंकवाद होता, हे माध्यमांतून का सांगितले जात नाही ? गोरक्षकांना गुंड म्हणून संबोधले जाते, त्यांच्यावर तडीपारीसारखे गुन्हे नोंदवले जातात. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा’ या संतवचनानुसार धर्मप्रेमींना गुंड संबोधत असाल, तर ‘हो, आम्ही गुंड आहोत’. हिंदूंचे सण, उत्सव यांवेळी ध्वनीप्रदूषणाच्या कायद्याचे कारण देत ध्वनीक्षेपक बंद करायला लावणारे मशिदींवरील अवैध भोंग्याच्या विरोधात कारवाई का करत नाहीत ? हज यात्रेला अनुदान देणारे सरकार हिंदूंच्या तीर्थयात्रांना अनुदान का देत नाही ? भक्तांनी मंदिरात श्रध्देने अर्पण केलेला निधी विकासकामांच्या नावाखाली हवा तसा वापरला जातो. विकास कामे करायचीच आहेत, तर त्यासाठी केवळ हिंदूंच्या मंदिरांचाच पैसा का वापरता ? मशिदी आणि चर्च यांतील पैसा घेण्याचे धारिष्ट शासन का दाखवत नाही ? राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतांनाही प्रतिदिन कुठेनाकुठे गोमाता-गोवंश ययांच्या मांसाने भरलेल्या गाडया पकडल्या जातात. या कायद्याची कठोरपणे पालन का होत नाही?

.. मग आतंकवादी याकूब मेमन याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या लोकांविषयी प्रसिध्दीमाध्यमांना प्रश्न का पडत नाही ? – सौ. नयना भगत, प्रवक्तया, सनातन संस्था

धर्मकार्य करणाऱ्या प्रत्येक संघटनेवर आज आघात होत आहेत. हे आघात खरेतर हिंदु धर्मावर होत आहेत. या आघातांना विरोध करण्यासाठी जो योध्दा उभा राहतो, तो प्रत्येक योध्दा आमचा आहे. या भागात अवैधपणे रहाणारे नायजेरीयन, बीफ माफिया यांच्या विरोधात आंदोलने करून हिंदूंना संघटित करणाऱ्या गोरक्षक वैभव राऊत यांना स्फोटके बाळगल्याच्या कथित आरोपाखाली अटक झाली, तेव्हा त्यांच्या समर्थनरसाठी सहस्रावधी धर्मप्रेमींनी रस्त्यावर उतरून या अटकेचा निषेध केला, तेव्हा ‘गुन्हेगाराच्या समर्थनार्थ लोक कसे गोळा होतात ?’असा प्रश्न पुरोगामी आणि प्रसिध्दी माध्यमांना पडला. हाच प्रश्न मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी फासावर लटकवलेल्या याकूब मेमन या आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांविषयी का पडला नाही?  वर्ष 2023 मध्ये हिंदु राष्ट्र येणार आहे. यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, ज्याचा धसका पुरोगाम्यांनी घेतला आहे. त्यामुळेच सनातनच्या साधकांना खोटया गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. आंदोलने, सभा आणि धार्मिक कार्यक्रम यांसाठी हिंदूंनी पोलिसांकडे रितसर अनुमती मागितल्यावर त्यांना जमावबंदीची नोटीस दिली जाते. हिंदूच्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाकारायला हा पाकिस्तान आहे का ? या सर्व अन्यायाच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हायला हवे.

सभेच्या व्यासपिठापुढे ठेवण्यात आलेली सवत्स गोमातेची मूर्ती उपस्थितांचे आकर्षण ठरली होती. हिंदु गोवंश रक्षा समितीचे कार्याची माहिती देणारा छायाचित्रांचा ‘स्लाइड शो’ सभा चालू असतांना प्रोजेक्टरवर दाखवण्यात येत होता. प्रदर्शनस्थळी योग वेदांत समिती आणि सनातन संस्था यांचे ग्रंथ, सात्त्वि उत्पादने आणि औेषधी झाडांचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र लावण्यात आले होते. सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांच्या पराक्रमाविषयी माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

सभेच्या शेवटी गोरक्षक  वैभव राऊत यांच्या सुपूत्र कु. जय राऊत (वय 9 वर्षे ) आणि पुतण्या कु. गौरव राऊत (वय 9 वर्षे ) यांनी संपूर्ण वन्दे मातरम् म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!