नगरसेवकाला वाचवण्यासाठी पोलीसांनी घेतला जमीनीचा मोबदला ? पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

वसई (वार्ताहर) : ४२० कलमातील नगरसेवकाला वाचवण्यासाठी दोन पोलीसांनी जमीनीचा मोबदला घेतल्याचे तक्रारदाराने उघडकिस आणून पोलीस अधिक्षकांकडे कारवाईची मागणी केली आहे.

बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अरुण जाधव यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात ४२० कलमांसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई न करता,त्यांना पाठीशी घालण्यासाठी पोलीस हवालदार राजेश महाजन आणि शाम शिंदे यांनी जाधव यांच्याकडून जमीनीचा मोबदला घेतला आहे.मौजे मोरेगांव येथील सर्वे.न.ं८२/१ क्षेत्र हे.आर.०-४७-५० ही जमीन अरुण जाधव यांचे बंधु शेखर जाधव यांनी पोलीस महाजन यांचे भाऊ सचिन महाजन आणि शाम शिंदे यांच्या पत्नी माला शिंदे यांच्या नावावर केली आहे.अशी तक्रार कुमार काकडे यांनी पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांच्याकडे केली आहे.

या जमीनीच्या खरेदीचे नोंदणी केलेले दस्तही काकडे यांनी गौरव सिंह यांच्याकडे सादर केले आहेत. नगरसेवक जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी महाजन आणि शिंदे यांनी जमीनीचा मोबदला घेवून पोलीस खात्याला काळीमा फासला आहे.त्यामुळे त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात यावी.अशी मागणीही काकडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!