नगरसेवक जाधवना एम.आर.टी.पी ची चौथी नोटीस

वसई (वार्ताहर) : अनधिकृत बांधकाम प्रकरणात अडकलेले बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अरुण जाधव यांना महापालिकेने चौथ्या प्रकरणात एमआरटीपीची नोटीस बजावली आहे.

नालासोपारा पुर्वेकडील मौजे तुळींज येथील सर्वे क्र.७६/३,गणेश अपार्टमेंट ही तळमजला अधिक तीन मजली इमारत विकास परवाना न घेता उभारण्यात आल्यामुळे नगरसेवक अरुण जाधव यांना १४ जानेवारीला प्रभाग समिती ई च्या सहाय्यक आयुक्ता मनाली शिंदे यांनी एमआरटीपीची नोटीस बजावली आहे. ३० दिवसांत सदर अनधिकृत बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे असेही या नोटीसीत नमुद करण्यात आले आहे.अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जाधव यांना बजावण्यात आलेली एमआरटीपीची हा चौथी नोटीस आहे.

नालासोपारा पुर्वेकडील मौजे तुळींज येथील सर्वे क्र.९७ मध्ये पार्वतीधाम अपार्टमेंट या इमारतीचे अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरमी नगरसेवक अरुण जाधव यांना सहाय्यक आयुक्त विजय चव्हाण यांनी त्यांना एमआरटीपी चे कलम 52,53,54 अन्वये २ डिसेंबरला नोटीस बजावली होती.तसेच मौजे मोरे येथील सर्वे क्र.९९ हिस्सा क्र.३ वर सिडकोची बनावट परवानगी दाखवून सिध्दीविनायक नावाची बहुमजली इमारत उभारल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात फरार असताना पोलीसांनी छापा मारून त्यांना अटक केले होते. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीही झाली होती.सर्वे क्र.९९ हिस्सा क्र.1 मध्येही गणेशधाम नावाची दोन विंगची चार मजली इमारत अरुण जाधव यांनी बांधली होती. या प्रकरणात त्यांना जामीन झाला होता.तसेच जाधव यांनी उभारलेल्या अनधिकृत इमारतींतील १५० फ्लॅटना अधिकृत घरपट्टी लावण्यात आली होती.त्यामुळे सन २००७ पासून जाधव यांनी महापालिकेची फसवणूक करून लाखो रुपयांचा महसुल बुडवल्याचे तक्रारदार कुमार काकडे यांनी उघडकिस आणले होते.

अरुण जाधव हे प्रभाग क्र.५२ चे नगरसेवक आहेत. अनधिकृत बांधकामात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या नगरसेवकाचा सहभाग दिसून आला तर त्यांचे नगरसवेक पद बाद करण्याचे महापालिकेच्या अधिनियमात म्हटले आहे.मात्र,अरुण जाधव यांचा अनेकदा अनधिकृत बांधकामात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे महापालिकेनेच चौथ्यांदा बजावलेल्या एम.आर.टी.पी च्या नोटीसेवरून देवून अधोरोखित झाले आहे. तरिही त्यांचे नगरसेवकपद बाद करण्यात आलेले नाही. महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. या आघाडीचे अरुण जाधव हे नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: