नगरसेवक लोपीस यांच्या प्रयत्नांना यश ; उमराळे,नाळेत पालिकेचे आरोग्य केंद्र होणार

वसई (प्रतिनिधी) : भुईगांव ते आगाशी दरम्यानच्या ग्रामस्थांच्या सेवेसाठी लवकर महापालिकेद्वारे आरोग्य केंद्र सुरु करण्यात येणार आहे.येथील नगरसेवक मार्शल लोपीस यांनी तशी मागणी सातत्याने केली होती.

उत्तर वसईच्या भुईगांव ते आगाशी दरम्यान पालिकेचे आरोग्य केंद्र नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना विविध आजारांवर उपचार करण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये जावे लागत आहे.या परिसरात 19 आदिवासी पाडे आणि शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात असून,त्यांना महागडे औषधोपचार परवडत नसल्यामुळे महापालिकेने आरोग्य केंद्र उभारावे अशी मागणी सातत्याने केली होती.त्यांच्या या मागणीला यश आले असून,नाताळ गोठा स्पर्धेच्या वेळेला आमदार हितेंद्र ठाकुर यांनी तशी घोषणा केली आहे.

त्यानुसार उमराळे येथे आरोग्य केंद्र सुरु करण्यात येणार आहे.त्यासाठी पालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ.चौहान आणि नगरसेवक डॉ्टर शिरसाड यांनी पाहणी केली असून,येत्या महिनाभरात हे केंद्र सुरु होईल आणि वर्षभरात नाळे येथेही एक आरोग्य केंद्र सुरु होईल अशी माहिती नगरसेवक मार्शल लोपीस यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!