नववर्षात भाजपाला धक्का ; २९ गावांसाठी ख्रिस्ती पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

वसई (वार्ताहर) : २९ गावे वगळण्याचे आश्वासन देवूनही ते न पाळल्यामुळे भाजपाच्या ख्रिस्ती पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

महापालिकेच्या क्षेत्रातून गावे वगळण्याच्या मुद्यावर वसई तालु्यात अनेक आंदोलने झाली.वसईकर जनतेला पोलीसांचा लाठीमारही सहन करावा लागला.त्यांना तुरुंगवास भोगावा लागलाच,गुन्हेही दाखल झाल्यामुळे परदेश गमनाची संधीही घालवावी लागली.गावे वगळण्याच्या मुद्यांवर विवेक पंडीत आमदार निवडूनही आले आणि याच मुद्यावर त्यांचा पराभवही झाला.अनेक वसईकर आंदोलक विविध पक्षात सामील झाले तर काहीनीं दबाव गटही तयार केला.अनेकांनी वेगळी संघटना काढली तर जुन्या संघटनेने त्यांना काढून टाकले.गेल्या सात-आठ वर्षात तालु्यात अनेक घडामोडी झाल्या.

सत्तेसाठी भाजपाने गावे वगळण्याचे आश्वासन देवून सत्ताही काबीज केली.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनीही गावे वगळण्याचे आश्वासन दिले.तरिही गावे वगळण्याचा मुद्दा कायम राहिल्याने  वसईतील भाजपाच्या ख्रिस्ती पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव रि्सन तुस्कानो,अल्पसंख्याक अध्यक्ष विजय तुस्कानो,वार्ड अध्यक्ष डेरिक डाबरे, जिल्हा युवा चिटणीस स्टिफन परेरा,आगाशीचे वॉर्ड अध्यक्ष रॉबर्ट लोपीस,विभाग प्रमुख डेव्हिड मच्याडो आणि आल्फँड मच्याडो या पदाधिकाऱ्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.वसई तालु्यातील अनेक घडामोडी,जडणघडणीत या पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग आहे.त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे भाजपाला नव्या वर्षात मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!