नागरिकांना मोठा दिलासा ; नव्या बस ताफ्यातही वाढ होणार

वसई (प्रतिनीधी) : कोरोना विरुद्धच्या लढ्याचा एक भाग म्हणून वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने चालू असलेली परिवहन सेवा सुद्धा ठप्प झाली होती. परिणामी प्रवासी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. मात्र जस जसे नियम शिथिल करण्यात आले आणि परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे तस तशी आपली परिवहन सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी असंख्य नागरिक व प्रवासी संघटनांनी लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर ,आम.क्षितीज ठाकूर आणि आम.राजेश पाटील यांच्याकडे केली होती.

गेल्या काही महिन्यांपासून कडक लाॅकडाऊन आणि परिवहन ठेकेदार बदली या मुळे ही परिवहन सेवा जवळपास बंद झाली होती. आता सर्व प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मान्यता मिळाल्याने परिवहन समिती या प्रशासकीय कारभार काळात सुद्धा जनतेला अत्यंत गरजेची अशी प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करुन देत आहे. लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर, आम.क्षितीज ठाकूर, आम.राजेश पाटील, प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीनचे सभापती प्रितेश पाटील व सर्व सदस्यांनी या नागरी सुवेधेसाठी सततचा पाठपुरावा केला आहे.

नव्या ६० बसेसचा ताफा : महापालिकेच्या वतीने नव्या वर्षाची भेट म्हणून नागरिकांच्या सेवेसाठी ६० नव्या बसचा ताफा आला आहे.

आधीच्या आपल्या पालिकेच्या ३० बस सेवेत दाखल झाल्या आहेत. आणखी ९० बसेस उपलब्ध होत आहेत. अशा १८० बस आपल्या भागात विविध मार्गांनी प्रवासी सेवा लवकरच देणार आहेत. नवे मार्ग सुद्धा निर्माण होणार आहेत. या व्यापक यंत्रणेमुळे लोकल ट्रेनवरचा भारही कमी होईल. तालुक्यातील लाखो नागरिकांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. एक व दोन जानेवारीला विरार नालासोपारा आणि नवघर-माणिकपूर व वसई येथील विविध ठिकाणी बहुजन विकास आघाडी पक्षाचे नेते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत या नव्या प्रवासी वाहतूक सेवेचा पुन्हा आरंभ करण्यात आला.

भा.ज.पा.चा पोरकट प्रयत्न : श्रेय घेण्यासाठी पेपरबाजी

दरम्यान, या परिवहन सेवेच्या संदर्भात आम्ही मोर्चा काढला होता म्हणून ही सेवा सुरु होत आहे असे येथील काही भाजपाईनेते म्हणत आहेत. आमच्या चांगल्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा पोरकट प्रयत्न असल्याचे विधान परिवहन समिती सदस्य अमित वैद्य यांनी केले आहे. केवळ परिवहन याच नाही तर अनेक अन्य समस्यांवर बहुजन विकास आघाडी पक्षाने शासकीय मदतीची वाट न बघता पक्ष, कार्यकर्ते आणि लोकवर्गणी या बळावर मदत कार्य, सेवा-सुविधा आणि गरजुंपर्यंत मदतीचा हात पुढे केला आहे. असेही वैद्य पुढे म्हणाले.

बी.एम.आर.डी.ए. क्षेत्रात वसई (तालुक्यासह) महापालिका आपली परिवहन सेवा उपलब्ध करुन देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!