नाती तुटल्यामुळे माणूस एकाकी झाला – फादर ऍण्ड्रयू रॉड्रिग्ज

वसई : माणसाचं झाड जिवंत राहण्यासाठी नात्याचा ओलावा आवश्यक असतो. समृध्द नातेसंबंध असलेली माणसं सदा आनंदी आणि सुखी असतात याउलट नाती तुटलेली माणसं एकाकी होतात. आदिवासी समाजात माणूस मरण पावला की, संपूर्ण गाव शोकाकुल होऊन रडतो. आपल्या साखळीतला एक दुवा निखळल्माचं त्यांना दु:खं असते याउलट स्वत:ला सुशिक्षीत, सुसंस्कृत म्हणून घेणारा समाज मात्र दिवसेंदिवस एकाकी आणि एककली होऊ लागला आहे. आपण नाती संपवून टाकली आहेत म्हणूनच आपण एकाकी आहोत असे उद्गार सुवार्ता मासिकाचे माजी संपादक फादर ऍण्ड्रयू रॉड्रिग्ज यांनी रविवार दि. ७ एप्रिल २०१९ रोजी बंगली नाका, वसई येथील लोकसेवा मंडळ सभागृहात संपन्न झालेल्या विवियन बरबोज लिखित ‘न संपलेलं नातं’ या पुस्तक प्रकाशन सोहळयात बोलताना काढले.

प्रमुख वक्ते कवीवर्य सायमन मार्टिन आपल्या भाषणात म्हणाले, डिजीटल क्रांतीमुळे भाषा नष्ट होण्माच्या मार्गावर आहेत. पूर्वी माणसं शब्दातून, बोलण्यातून व्मक्त व्हायची. आता समाज माध्यमावरील निरोपातून व्यक्त होत आहेत. घरातला संवाद आटला आहे कारण नवीन पीढी आभासी जगात रममाण झालेली आहे. संवादहीनतेमुळे संवेदनाहीन समाज आकाराला येत आहे. जे प्रेम त्वचेला चीकटलेलं असते त्यालाच ओहोटी लागलेली आहे. आपल्या आजूबाजूला जे नवीन प्रश्न तयार झाले आहेत त्याला भीडण्याचं काम लेखकाला करायचे असते, समाजाने देखील पुस्तकावर विश्वास ठेवावा आणि आपल्या आयुष्यात त्यांना जागा द्यावी.

चित्रकार मनोज आचार्य आपल्या भाषणात म्हणाले, विवियन बरबोज यांची भाषा प्रवाही आणि सहजसोपी आहे. येथल्या समाज जीवनाचं चित्रण त्यांनी त्यांच्या कादंबरीत केलेलं आहे. वसईत अनेक समृध्द बोलीभाषा आहेत. मेथल्मा लेखकांनी आपल्मा बोलीभाषेत लेखन करावे त्यामुळेच त्या टिकून राहतील.

याप्रसंगी माजी आमदार डॉमणिक घोन्सालविस, फ्रान्सीस कुटिन्हो,क्लेरा राजू मार्टिन, रोहन घोन्सालविस, डॉ. संतोष पिल्ले, मुरी घोन्सालविस आदिंची भाषणं झाली. उपस्थितांचे स्वागत लेनी परेरा,प्रास्ताविक भाषण फ्रान्सीस घोन्सालविस, जेनीफर लोपीस यांनी प्रार्थनागीत, मीनाक्षी फोल्सेका व डॉनल्ड डिसिल्वा यांनी सूत्रसंचालन केले. विवियन बरबोज यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!